belgaum

बेळगाव जिल्ह्यातील ९० जिल्हा पंचायत मतदारसंघांचे आरक्षण जाहीर

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तयारीला वेग येण्याची शक्यता असताना कर्नाटक सरकारच्या ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाने जिल्ह्यातील ९० जिल्हा पंचायत प्रादेशिक मतदारसंघांच्या आरक्षणाचा मसुदा जाहीर केला आहे. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या कर्नाटक राजपत्रातील अधिसूचनेनुसार, सामान्य, महिला, अनुसूचित जाती-जमाती तसेच मागासवर्गीय अ आणि ब प्रवर्गांसाठी मतदारसंघांचे आरक्षण नमूद करण्यात आले आहे.

या आरक्षणावर हरकती व आक्षेप नोंदविण्यासाठी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांचे या आरक्षणाकडे लक्ष लागले आहे.

कर्नाटक ग्राम स्वराज आणि पंचायत राज अधिनियम, १९९३ मधील कलम १६२ आणि २०२३ मधील आरक्षण नियमांनुसार ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापूर्वी जारी केलेल्या संबंधित अधिसूचना रद्द करण्यात आल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे.

 belgaum

मतदारसंघनिहाय आरक्षणाची संपूर्ण यादी

खालील तक्त्यांमध्ये राजपत्रातील मतदारसंघ क्रमांक, नावे आणि आरक्षणाचे प्रवर्ग दिले आहेत. नावे मराठी वाचनसुलभतेसाठी देवनागरीत लिहिली आहेत.

तक्ता १ : मतदारसंघ क्रमांक १ ते ३०

क्र.जिल्हा पंचायत मतदारसंघआरक्षण
१अनंतपूरसामान्य (महिला)
२गुंडेवाडीसामान्य
३मदभावीसामान्य
४अथणी ग्रामीणसामान्य (महिला)
५दरूर (शेगुणशी)अनुसूचित जाती (महिला)
६सत्तीमागासवर्गीय अ
७कोकटनूरअनुसूचित जाती
८ऐगळीसामान्य (महिला)
९तेलसंगसामान्य
१०मोळेसामान्य
११मंगसुळीसामान्य (महिला)
१२उगार बुद्रुकमागासवर्गीय अ
१३नेसरगीसामान्य
१४नागनूरअनुसूचित जमाती (महिला)
१५संपगावसामान्य (महिला)
१६संगोळीसामान्य (महिला)
१७बेळवडीसामान्य (महिला)
१८दोडवाडमागासवर्गीय अ (महिला)
१९अंबडगट्टीअनुसूचित जमाती
२०खोडानपूरमागासवर्गीय अ
२१काद्रोळीमागासवर्गीय ब
२२काकतीअनुसूचित जमाती (महिला)
२३कडोलीसामान्य (महिला)
२४हुडलीसामान्य
२५उचगावमागासवर्गीय ब
२६बेळगुंदीसामान्य (महिला)
२७येळ्ळूरमागासवर्गीय अ (महिला)
२८हलगासामान्य
२९अंकलगीसामान्य
३०सांबरामागासवर्गीय अ

तक्ता २ : मतदारसंघ क्रमांक ३१ ते ६०

क्र.जिल्हा पंचायत मतदारसंघआरक्षण
३१सुलेभावीसामान्य
३२हिरेबुद्दीमागासवर्गीय अ (महिला)
३३मांजरीसामान्य (महिला)
३४केरूरअनुसूचित जाती (महिला)
३५खडकळाटसामान्य
३६पट्टणकुडीमागासवर्गीय अ
३७करोषीसामान्य (महिला)
३८नागरमुन्नोळीसामान्य (महिला)
३९कारदगासामान्य
४०कोगनोळीसामान्य
४१बेडकीहाळमागासवर्गीय अ (महिला)
४२सौंदलगामागासवर्गीय अ (महिला)
४३अक्कोळअनुसूचित जाती
४४सुलदाळसामान्य
४५तवगअनुसूचित जमाती (महिला)
४६मक्कळगेरीसामान्य
४७ममदापूरमागासवर्गीय अ
४८काब्बळगीअनुसूचित जाती (महिला)
४९मेळवणकीमागासवर्गीय अ
५०शिंदिकुरबेटसामान्य (महिला)
५१तुक्कानट्टीमागासवर्गीय ब (महिला)
५२हल्लूरमागासवर्गीय अ (महिला)
५३कुलगोडसामान्य
५४यादवाडअनुसूचित जाती
५५कणगलासामान्य
५६अम्मणगीसामान्य
५७एलिमुन्नोळीमागासवर्गीय अ
५८बेल्लद बागेवाडीअनुसूचित जाती (महिला)
५९घोडगेरीमागासवर्गीय अ (महिला)
६०हेब्बाळसामान्य (महिला)

तक्ता ३ : मतदारसंघ क्रमांक ६१ ते ९०

क्र.जिल्हा पंचायत मतदारसंघआरक्षण
६१राणा हत्तरगीअनुसूचित जमाती
६२दड्डीसामान्य
६३पाश्चापूरमागासवर्गीय अ (महिला)
६४जांबोटीसामान्य
६५गर्लगुंजीसामान्य (महिला)
६६पारिश्वाडअनुसूचित जाती (महिला)
६७कक्केरीअनुसूचित जमाती (महिला)
६८नंदगडमागासवर्गीय अ (महिला)
६९लोंडासामान्य (महिला)
७०कुडची ग्रामीणमागासवर्गीय अ
७१अलखनूरमागासवर्गीय अ (महिला)
७२हिडकलसामान्य (महिला)
७३इटनाळसामान्य
७४मेखळीसामान्य (महिला)
७५रायबाग ग्रामीणअनुसूचित जाती (महिला)
७६नसलापूरसामान्य (महिला)
७७हुलकुंदसामान्य (महिला)
७८बटाकुर्कीअनुसूचित जाती
७९कटकळमागासवर्गीय ब (महिला)
८०गोडचीमागासवर्गीय अ
८१हलगत्तीसामान्य (महिला)
८२सुरेबानसामान्य
८३उगरगोलमागासवर्गीय ब (महिला)
८४हुलीमागासवर्गीय अ
८५शिंदोगीमागासवर्गीय अ (महिला)
८६करीकट्टीसामान्य
८७होसूरअनुसूचित जाती
८८मुरगोडसामान्य
८९यरझर्वीअनुसूचित जमाती
९०सत्तिगेरीसामान्य

१९ ऑक्टोबरपर्यंत हरकती दाखल करता येणार

आरक्षणाबाबत आक्षेप असलेल्या नागरिकांनी आवश्यक पूरक कागदपत्रांसह लेखी हरकत सादर करावी. हरकत प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे पुढील पत्त्यावर पाठविता येईल.

सचिव (पंचायत राज),
ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग,
बहुमजली इमारत, तिसरा टप्पा, तिसरा मजला,
डॉ. आंबेडकर वीथी, बेंगळुरू – ५६०००१.

अंतिम मुदत : १९ ऑक्टोबर २०२६, सायंकाळी ५ वाजेपर्यंत.

मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. टपालाने पाठविलेली हरकत अंतिम मुदतीपूर्वी संबंधित कार्यालयात पोहोचण्याची जबाबदारी अर्जदाराची असेल, असे अधिसूचनेत नमूद आहे.

अंतिम आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष

जाहीर करण्यात आलेले आरक्षण सध्या मसुदा स्वरूपात आहे. हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम आरक्षणाबाबत पुढील निर्णय होईल. त्यामुळे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची, याचे नियोजन करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी ही अधिसूचना महत्त्वाची ठरणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.