Friday, May 24, 2024

/

कर्नाटकाच्या गुन्हेगारांच्या यादीत आता धनंजय मुंडेही

 belgaum

महाराष्ट्र एकिकरण समितीने बेळगावमध्ये आयोजित केलेल्या महामेळाव्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केलेल्या घणाघाती भाषणामुळे कर्नाटक सरकार चांगलेच धास्तावले असुन या मेळाव्यातील मुंडे यांच्या भाषणाला प्रक्षोभक ठरवत त्यांच्या विरूध्द सोमवारी सायंकाळी उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे कर्नाटक सरकारच्या गुन्हेगारांच्या यादीत महाराष्ट्रातील आणखी एक नाव दाखल झाले आहे.
आर आर आबा, शरद पवार जी,छगनजी भुजबळ,  सेनेचे खासदार संजय राऊत, जयंत पाटील या सारख्या दिग्गज नेत्यांवर या आधी गुन्हे घालण्यात आले होते आता महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेतेही या यादीत आले आहेत.

Mundhe devne Mundhe
सीमाभागातील मराठी बांधवांवर होणार्‍या अन्यायाविरुध्द वाचा फोडण्यासाठी तसेच बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी सोमवारी बेळगावात एकीकरण समितीच्या वतीने आयोजित महामेळाव्यासाठी धनंजय मुंडे यांना निमंत्रित करण्यात आले होते.
या मेळाव्यासाठी मुंडे यांना उपस्थित राहता येऊ नये यासाठी कर्नाटक सरकारने त्यांना प्रोटोकॉल नाकारला. इतकेच नव्हे तर दोन दिवस कर्नाटक पोलिस त्यांच्या मागावर होते. मात्र पोलिसांना गुंगारा देत मुंडे यांनी रविवारी रात्रीच बेळगाव गाठले आणि संमेलनाला उपस्थित राहुन जोरदार भाषणही दिले.
मुंडे यांच्या या भाषणामुळे कर्नाटक सरकारचा चांगलाच तिळपापड झाला आहे.
कर्नाटक सरकार विरूध्द रस्त्यावर, न्यायालयात, सभागृहात शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्धार करतांना या आंदोलनात युवकांनी आता पुढाकार घ्यावा असे आवाहन करत युवकांच्या भावनाही मुंडे यांनी चांगल्याच पेटवल्या होत्या त्यामुळे पित्त खवळलेल्या कर्नाटक सरकारने त्यांच्या विरूध्द प्रक्षोभक भाषण केल्यावरून गुन्हा दाखल केला आहे

टिळकवाडी पोलिसांनी IPC 341, 188,283,r/w 34, &109  अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
मुंडे यांच्यासह कोल्हापुर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे, एकिकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी व इतर पदाधिकार्‍यांवरही गुन्हे दाखल करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान सीमाभागातील आपल्या मराठी बांधवांसाठी असे १  नाही तर ५६ गुन्हे दाखल झाले तरी आपण त्याला भित नाही असे प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.