कर्नाटक विधानसभेत काँग्रेस पक्षाच्या आमदाराला सरळ कन्नड बोलता येत नसल्याने सभाध्यक्ष रमेश कुमार यांना मी हिंदीत बोलू का? अशी विनंती केली आणि त्यांनीही हा बोलो असे सांगितले. यावरून चर्चा झाली पण जर समितीचे आमदार असताना असा प्रश्न विचारला असता तर काय झाले असते याची चर्चाही रंगली होती.
आमदार काँग्रेस पक्षाचे होते म्हणून बचावले हे वास्तव सुद्धा समोर आले आहे.कागवाड चे आमदार श्रीमंत पाटील हे मराठी भाषक आहेत. त्यांना कन्नड व्यवस्थित बोलता येत नाहीत. आज त्यांनी उच्च शिक्षण संदर्भात एक प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. पण त्यांना तो व्यवस्थित मांडता आला नाही. यामुळे हे सगळे रामायण घडले.
विधान सभाध्यक्ष रमेशकुमार यांनी हा तुम बोलो असे म्हणत तुमचे झाले की यु के २७ असे म्हटले. आणि एक हॉटेलची सुद्धा चर्चा झाली. ते हॉटेल आमदार उमेश कत्ती यांचे आहे. पुढचा प्रश्न असे म्हणून सभाध्यक्षांनी उमेश कत्ती यांचे नाव न घेता त्यांच्या हॉटेलचे नाव घेतले यामुळे विनोद झाला. सभाध्यक्ष याच हॉटेल मध्ये राहिले आहेत त्यामुळे या विनोदात आणखीनच भर पडली होती.
सध्या बेळगावात हिंदी बोलू की नको यावरून बरीच चर्चा होताना दिसते जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांना हिंदी बोलण्यास मज्जाव वन अधिकाऱ्यांने मज्जाव केला होता विधान सभेचे स्पीकर सभागृहात हिंदी बोला म्हणतात मात्र हे मराठी द्वेष्टे अधिकारी मराठी लोक प्रतिनिधींनी हिंदीत बोलले तर का चिडतात हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.