बस स्थानकासमोरील चौकाचे नाव बदलू नये या चौकास टिपू सुलतान चौक असे नाव देण्यात यावे अशी मागणी महापौर उपमहापौरा कडे करण्यात आली आहे.शनिवारी सकाळी महा पालिकेत उर्दू नगरसेवकांनी आणि टिपू सुलतान संघर्ष समितीच्या वतीने सदर मागणी करण्यात आली आहे.
मार्केट पोलीस स्थानकाच्या चौकास टिपू सुलतान चौक नाव देण्याचा प्रस्ताव बेळगाव पालिकेत अनेकदा मंजूर झाला आहे तरी देखील शनिवारच्या बैठकीत या चौकाचे नामकरण करण्याचा घाट घालण्यात आला आहे तो प्रस्ताव घेऊ नये या चौकास टिपू सुलतान नाव देण्यात यावे अशी मागणी उर्दू नगरसेवकांनी केली आहे.
यावेळी महापौर बसप्पा चिखलदिनी यांनी आजच्या बैठकीत हा विषय घेणार नसून इतर सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.यावेळी नगरसेवक बाबूलाल मुजावर,मुझम्मील डोनी, मतीन शेख,आरिफ कटगेरी,फझा खान पठाण,कुतुब बंदी आदी यावेळी उपस्थित होते.