Friday, March 29, 2024

/

बेळगावचा खासदार काँग्रेसचाच आणि मराठाच करू :सतीश जारकीहोळी

 belgaum

काँग्रेसची भूमिका सर्व धर्म समभावाची आहे. काँग्रेसने मराठा समाजावर कधीच दुजाभाव केला नाही जर योग्य उमेदवार मिळाला तर बेळगावची लोकसभेची उमेदवारी काँग्रेस पक्ष मराठा समाजातील नेत्याला देईल आणि मराठा माणसालाच खासदार करणार अशी भूमिका माजी मंत्री आणि यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव live कडे मांडली.

Satish jarkiholi
लोकसभेत बेळगाव उत्तर दक्षिण आणि ग्रामीण मतदार संघातील दोन लाख मराठा मतदान टर्निंग पॉईंट असते मागील वेळी याच भागात कमी मते पडल्याने काँग्रेसचा पराभव झाला होता त्यामुळं मराठा समाजाला का उमेदवारी देऊ नये ?असा प्रश्न त्यांनी केला.
मराठा समाजावर माझं व्यक्तिगत रित्या प्रेम आहे म्हणूनच पी एल डी बँकेवर मराठ्याला अध्यक्ष केलं तरए पी एम सी मध्ये मराठा समाजाला नेतृत्व दिलं यावेळीही एपीएमसीवर मराठा नेतृत्वच देणार आहोत असे ते म्हणाले.

बेळगाव लोकसभा सीट वर एस सी एस टी ,इतर मागास आणि मराठा एकत्र झाल्यास काँग्रेस साठी बरे होईल अशी भूमिका देखील सतीश जारकीहोळी यांनी मांडली.

 belgaum

कागवाड मध्ये श्रीमंत गौडा ला जसे यश मिळाले तसे बेळगावात लोकसभेत मराठा नेत्याला का मिळू नये असा प्रश्न देखील त्यांनी केला.
सतीश आण्णा जारकीहोळी यांनी बेळगाव live ला एक्सक्लुजीव मुलाखत देऊन आपली भूमिका मांडली आहे. आम्ही पक्षातर्फे योग्य मराठा नेत्यांची चाचपणी सुरू केली आहे ज्याला जनतेत मान आहे त्याला काँग्रेसचा खासदार करून दाखवणार असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.