belgaum

कर्करोगाने त्रस्त ज्येष्ठ डॉक्टरांची गोळी झाडून आत्महत्या

0
Tilakwadi police station
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्करोगाच्या आजाराने त्रस्त असलेल्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी गोडसेवाडी-मंडोळी रोड परिसरात घडली.

डॉ. दिनेश लक्ष्मण भटकळ (वय ७९) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचे नाव आहे. ते मूळचे उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्यातील रहिवासी असून, अनेक वर्षे वैद्यकीय सेवा बजावल्यानंतर बेळगावमध्ये स्थायिक झाले होते. साधे, मनमिळावू व्यक्तिमत्त्व आणि सेवाभावी वृत्तीमुळे ते समाजात तसेच वैद्यकीय क्षेत्रात आदराचे स्थान मिळवले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भटकळ यांनी त्यांच्या घराच्या बाल्कनीत स्वतःवर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

काही काळापासून ते गंभीर आजारपण आणि मानसिक नैराश्याने त्रस्त होते, अशी माहिती समोर आली आहे. याच कारणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.