शिव जयंती मिरवणुकीत विदेशी पाहुणे

0
 belgaum

शिव जयंती मिरवणुकीतयावर्षी शिवजयंती मिरवणुकीमध्ये जर्मनीचे एक जोडपे सर्वांचे आकर्षण ठरले होते ते आपल्या कॅमेऱ्यात चित्ररथावरील आकर्षक देखावे कैद करत होते.बेळगावातील शिव जयंती चित्ररथ  मिरवणुकी बाबत अतिशय कुतूहलाने माहिती जाणून घेत होते.बापट गल्ली येथील कालिकादेवी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी त्यानी संवाद साधला व मिरवणुकीचे वैशिष्ट्य आणि इतर माहिती जाणून घेतली.
यावेळी  मंडळाचे कार्यकर्ते महेश पावले यांनी शिवजयंती मिरवणूक उत्सवा बाबत माहिती दिली हे विदेशी पाहुणे कांही कामा निमित्त बेळगांव ला प्रथमच आले होते. शिव चित्र रथ मिरवणुकीचा आनंद आपल्याला घेता आला आम्ही खूप नशीबवान आहोत अशी प्रतिक्रिया त्यानी मंडळाच्या  सदस्यासमोर मांडली. यावेळी मंडळाच्या वतीने या विदेशी नागरिकांचा पाहुणचार व स्वागत फेटा बांधून करण्यात आले यावेळी हे पाहून खूप भावुक झाले.

Shiv jayanti

bg

छत्रपती शिवाजी  महाराजा बद्दल खूप ऐकलं होतं पण शिवजयंती मिरवणूक देखावे  व बेळगांवच्या नागरिकांचा उत्साह पाहून परत परत बेळगावला यावेसे वाटते अशी प्रतिक्रियाही त्यानी यावेळी दिली.
एकूणच मिरवणुकीमध्ये हे विदेशी जोडपे फेटा बांधून घेऊन सर्वांचे आकर्षण झाले होते . यावेळी अंकुश केसरकर व गजानन निलजकर,सुनिल मुरकूटे ,भाऊ किल्लेकर, अमोल केसरकर, धनंजय कणबरकर,व मंडळाचे कार्यकते होते.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.