Tuesday, April 16, 2024

/

मूळव्याध-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

हा अवघड ठिकाणी होणारा वेदनामय आजार बर्‍याच लोकांना होतो. मलाशयाच्या आत किंवा बाहेरच्या बाजूच्या रक्तवाहिन्यांत खराब रक्त जमा होऊन त्या रक्तवाहिन्या फुगतात व त्याठिकाणी दाह होतो. बाहेरच्या बाजूने होणार्‍या मूळव्याधीमुळे रुग्णाला खूप वेदना होतात. त्यातून फारसे रक्त येत नाही. परंतु अंतर्गत मूळव्याधीतून गडद रंगाचे रक्त पडते. काही वेळा रक्तवाहिन्या फुटतात. या मुळव्याधीला रक्त मूळव्याध असे म्हणतात.

मूळव्याधीची कारणे आणि लक्षणे : जुनाट बद्धकोष्ठता आणि आंतड्यातील बिघाड यामुळे मुख्यत: मूळव्याध होते. शौच्याच्यावेळी जोर दिल्याने मलाशयाच्या आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांवर दाब पडतो आणि मूळव्याध उद्भवतो. यकृत आणि आंतड्याच्या काही विशिष्ठ रोगामध्ये तसेच गर्भारपणी पोटातील अंतर्गत लाब वाढल्यास हमखास मूळव्याध होते. खूप वेळ उभे राहणे किंवा सतत बसणे, लठ्ठपणा, अशक्तपणा, मानसिक ताणतणाव, अतिकष्टाची कामे व अनुवंशिकता ही मूळव्याध होण्याची इतर कारणे आहेत.

 

 belgaum

Internal_and_external_hemorrhoids

उपचार

आहार नियोजन : सर्व पचनसंस्थेच्या तक्रारींचे मूळ कारण सदोष आहारपद्धतीमध्ये आहे. आपली पूर्वापार पान वाढायची पद्धत लक्षात घ्या. सर्व प्रकारचे रस व सर्व अन्नघटक सुबकरित्या, स्वच्छता राखून व्यवस्थित वाढलेले असायचं. आंबट, तुरट, कडू, गोड, तिखट रस, कच्च्या फळभाज्यांच्या कोशिंबिरी, मोड आणलेले कडधान्य, पालेभाजी सगळ्याचा क्रम ठरलेला असायचा. त्याशिवाय देवाचे नाव घेऊन, अन्न उत्पन्न करणार्‍याचे, रांधणार्‍या व वाढणार्‍या व्यक्तीचे आभार व्यक्त करुन भोजन करणे हा जणू एक साग्रसंगीत सोहळाच! पण यामुळे भोजन करणारा तृप्त होऊन जाई. मन व पोट दोन्हीही शांत राहात असे. परंतु आता तयार प्रक्रियायुक्त अन्नप्रकारांचे महत्त्व वाढल्यामुळे केव्हाही, कधीही कचवचत खाणे, काम करता करता, प्रवास करता करता खाणे, वेळी अवेळी शीत पेये घेणे यामुळे पोटाला अक्षरक्ष: कचराकुंडीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

पचनसंस्थेचे व इतर विकार टाळण्यासाठी घरगुती, सात्विक जेवणावर भर द्यायला हवा. प्रदेश व हवामानानुसार इष्ट असा आहार ठेवावा.

अति प्रमाणात मीठ, साखर व सोडा यांचा वापर टाळावा. मांसाहार शक्यतो टाळावा. पर्यावरणाचे भान राखावे, असे केल्याने कमीतकमी रोगांना तोंड द्यावे लागते. सहसा रोग होतच नाहीत.

होमिओपॅथी : बेंगलोरला आय. टी. क्षेत्रात काम करणारा एक तरुण, आपण त्याला अक्षय म्हणूया! अक्षयचें मुळव्याधीचं ऑपरेशन झालेलं. त्याला आधीच दोन वर्षापासून त्रास होता. पण आता ऑपरेशन होऊनही पुन्हा मुळव्याधीचा त्रास व्हायला लागला. एक तर कामाची, खाण्याची, झोपण्याची एकही ठराविक वेळ नाही. शिवाय भरपूर मानसिक ताण, बद्धकोष्ठाचा त्रास व्हायचाच व तीव्र वेदना, रक्ती मूळव्याध! त्याची फक्त लक्षणं आणि हिस्टरी पाहून एक होमिओपॅथिक औषध सहावेळा घ्यायला सांगितलं असता एका महिन्यातच त्रास पूर्णपणे थांबला. कोंडायुक्त चपाती-भाकरी व भरपूर पालेभाज्यांचा आहारात समावेश करायला सांगितल्यावर बद्धकोष्ठाची तक्रार कमी झाली. सगळ्या दिनक्रमाची वेळ ठरवून योजल्याप्रमाणे आहार घेतल्यावर पुन्हा अक्षयला कसलाही त्रास झाला नाही.

नक्सवोमिका, सल्फर, अ‍ॅस्क्युलस, हॅमेमॅलेस, कॅप्सीकम अशी अनेक औषधं होमिओपॅथीमध्ये उपयोगी आहेत.

बाराक्षार : कॅलकेरिया फ्लूर 3×, फेरम फॉस, 3×, काली मूर 3×, कॅल्केरिया फॉस 3×, इत्यादी औषधांचे मिश्रण मुळव्याधीवर उपयुक्त आहे.

निसर्गोपचार : रात्रभर पाण्यात भिजवलेले सुके अंजीर कुस्करुन पाण्यासकट प्यावेत. पांढरा मुळा 10 ग्रॅम (किसलेला) व एक चमचा मध एकत्र करुन दिवसातून दोनदा खावा. कारल्याच्या मूळीचा लेप मोडावर दोनदा खावा. कारल्याच्या मुळीचा लेप मोडावर लावल्याने दाह कमी होतो. तिळाचा काढा मूळव्याधीवर उपयुक्त ठरतो. 20 ग्रॅम तीळ साडेतीन कप पाण्यात उकळवावे. पाणी एक तृतीयांश आटवावे. ते तीळ पाणी वाटून लोणी घालून रुग्णास खायला द्यावे. मूळव्याधीतून रक्त जायचे थांबते. गव्हांकुराचा रस आतड्यांतील दूषीत द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतो. रोज सकाळी ताजा गव्हांकुराचा रस अनोश्यापोटी घ्यावा.

मूळव्याध हा मूळ आजार नसून अनेक आजार व विकारांचे ते लक्षण आहे. त्यावर योग्यवेळी उपचार करणे गरजेचे असते.

डस्टबीन ते यज्ञकर्म

रोजच जेवण, नाश्ता, वरचं खाणं, पिणं, रोजचा मेनू, हा समस्त स्त्रीवर्गाचा रोजचा यक्षप्रश्‍न! सकाळी उठता उठताच दिवसभराचा खाण्याचा प्रोग्रॅम काय याची जुळवाजुळव मेंदू आपसुकच करु लागतो. रोजचं जेवण चटकदार पाहिजे. सगळ्यांना अवडेल असं पाहिजे. आरोग्यदायी पाहिजे शिवाय पदार्थांचं रिपिटेशन नको. भेंडी, वांगी टाळता आलं तर बरंच आहे. एक ना नाना तर्‍हा! सासुसार्‍यांचं पथ्यपाणी, नवर्‍याच डाएट, मुलांची आवड हे सदासर्वकाळ जपणार्‍या स्त्रियांचे विशेष सन्मान केले पाहिजेत.

पोटाच्या पचनाच्या तक्रारी होतात

एकतर घड्याळाच्या काट्याबरोबर फिरताना हरी वरी करी या त्रयींमुळे अ‍ॅसिडीटी, पोटफुगी या तक्रारी वाढतात. शिवाय केव्हावी, कुठेही, कसेही (तीन के) खाण्यामुळे पोटाचे डस्टीबीन होऊन गेले आहे. या अशा खाण्यामुळे वजन तर वाढतच शिवाय कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईडस यांचे लेव्हलसुद्धा वाढतीच राहते. तेलाचा, चरबीचा, मांसाहाराचा अतिरेकसुद्धा पचनाच्या तक्रारींना आमंत्रण देणाराच असतो.

आहार म्हणजे यज्ञकर्म

अन्न हे पूर्णब्रह्म असं मनापासून मानणारी माणसंच आजकाल दुर्मिळ झाली आहेत. शंभरातले नव्वद टक्के लोक वेगवेगळ्या तर्‍हेने उदरभरणच करत असतात. कसंबसं अन्न गिळून, काहीबाही पोटात ढकलून आपण सगळेच कसल्यास कसल्या वेळा पाळण्यासाठी जीव टाकत असतो. शांतपणे बसून ताज्या अन्नाचा स्वाद घेणं, आवश्यक ते आवश्यक तेवढंच खाणं हे उत्तम जगण्याचं सार शिकायला हव, आत्मसात करायला हवं. खरं तर आपल जगणं सुखकर व्हावं म्हणून दिवसातून चार वेळा 15-15 मिनिट खाण्यासाठी व 1 तास व्यायामासाठी देणं आवश्यक आहे. सकाळी न्यूज पेपरमध्ये आरोग्याच्या व आहाराच्या उपयुक्त गोष्टी फक्त वाचून आरोग्य मिळत नसते ते पूर्ण आचरणात आणावं लागतं. सगळं कुठल जमायला असं म्हणून सुस्कारे टाकत अ‍ॅडजस्टमेंट खाणी उरकली जातात. कितीही मॉडर्नायझेशन झालं तरी स्वयंपाकघराची जबाबदारी स्त्रीकडेच राहते, असे न होता खानपानामध्ये कुटूंबातील प्रत्येकाने लक्ष घातले पाहिजे. घरात प्रत्येकाची आहाराबद्दल जागरूकता वाढली पाहिजो सर्वांना रूचेल, पचेल आणि पौष्टिकही असेल अशाच गोष्टी घरी बनतील याबद्दल प्रत्येकानं दक्ष असलं पाहिजे. चटपटीत जंक फुड खाण्यासाठी महिन्यातील एक दिवस वेगळाच काढावा. कारण खाऊ नका म्हणलं तरी जास्त खावं वाटतं असा एक वेगळाच सूर येतो तेव्हा तशीही सोय करून ठेवावी पण प्रमाणशीर! नवरा बायको दोघेही दिवसभर घराबाहेर रहात असतील तर नोकरी व्यवसाय सांभाळूनही ताजं अन्न कसं घेता येईल याकडे कटाक्ष ठेवणं फार गरजेचे आहे. सकाळचा भरपेट नाश्ता व दूध दुपारी डब्यात सँडवीच नाहीतर काहीतरी स्नॅक संध्याकाळी वनडीशमील असा मेनू ठेवून नाविन्य व सकसपणा दोन्ही साधता येतं. लहान मुलांची आवड व शरीराची आवश्यकता दोन्ही पाहून आहार ठरवावा, अन्नाचा आस्वाद घेणं व दाद देणं हे सुध्दा महत्वाचं आहे.

पोटाची डस्टबीन न बनवता आहाराचं यज्ञकर्म बनवणं आपल्याच हातात आहे. तरच पोटाच्या तक्रारी आटोक्यात राहतील.

Dr sonali sarnobat

 

संपर्क
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक – ९९१६१०६८९६
सरनोबत क्लिनिक- ९९६४९४६९१८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.