belgaum

कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलासह वाहन पोलिसांच्या ताब्यात

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये अल्पवयीन मुलाने बेकायदेशीरपणे कार चालवल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून वाहन मालकाला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

बेळगाव शहरातील चन्नम्मा सर्कल जवळील गणेश मंदिरानाजीक सकाळी १०:५० वाजण्याच्या सुमारास एका अल्पवयीन मुलाला केए-२६-एम-३४०९ क्रमांकाची कार चालवताना वाहतूक पोलिसांनी पकडले. पोलिसांनी कारसह त्या मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलवून घेतले.

अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे हा दंडनीय गुन्हा असल्याची समज पोलिसांनी पालकांना दिली. याप्रकरणी मोटार वाहन कायद्यांतर्गत नोटीस बजावण्यात आली असून वाहन मालकाला आता न्यायालयात २५,००० रुपये दंड भरावा लागणार आहे.

 belgaum

त्यामुळे बेळगावमधील पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यासाठी देऊ नयेत.

वाहतूक नियमांचे पालन करून रस्त्यावरील नागरिक आणि वाहनांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून नागरिकांनी नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त यांनी केले आहे.

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन केल्याप्रकरणी महिलेसह 8 जणांना अटक

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर आणि बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण सात जणांना अटक करण्यात आली असून एका महिलेला बेकायदेशीर दारू विक्रीप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

मारिहाळ पोलिसांच्या हद्दीत सुळभावी-मोदगा रस्त्यावर खुल्या जागेत दारू पिणाऱ्या दुंडय्या हिरेमठ आणि रेवस्त्था पाटील यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. मार्केट पोलिसांनी जुन्या भाजी मार्केट जवळ कारवाई करत राहुल जाधव आणि आकाश लोहार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. काकती पोलिसांनी अलतगा खडी मशीनजवळ दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अबुबकर शाहपूरकर, समीर शेख आणि बसवंत दोंडे यांना मद्यप्राशन करताना रंगेहात पकडले.
हिरेबागेवाडी पोलिसांनी बस्तवड गावाजवळ लोकांना दारू पिण्यास जागा देणाऱ्या परशुराम हणमतांचे याला अटक केली, तर हुलगवी गावात बेकायदेशीर दारू बाळगणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेऊन दारूसाठा जप्त केला आहे.

या सर्व कारवाया करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.