belgaum

आदित्यराज प्रकरणात सीआयडी सक्रिय; पुरावे आणि चौकशीला गती

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या कथित हजारो कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयडीने हालचाली वाढवल्या आहेत. त्या अनुषंगाने सोमवारी सीआयडीचे डीवायएसपी रवी एच. यांनी टिळकवाडी पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाच्या प्रगतीचा आढावा घेतला.


अधिक व्याजाचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून घेतल्याचा आरोप आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडवर आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची व्याप्ती, गुंतवणूकदारांची संख्या आणि फसवणुकीचे स्वरूप लक्षात घेता तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे.


यावेळी खडेबाजार उपविभागाचे एसीपी शेखरप्पा यांनी डीवायएसपी रवी एच. यांना स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाची सविस्तर माहिती दिली. प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि अन्य महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेण्यात आला.

 belgaum


दरम्यान, सीआयडी पथक लवकरच महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याबरोबरच प्रकरणाशी संबंधित व्यक्तींची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बहुचर्चित प्रकरणात आगामी काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.