belgaum

माझे राज्यसभा सदस्यत्व येत्या 15 जून रोजी संपुष्टात -इराण्णा कडाडी

0
Iranna kadadi
Iranna kadadi
 belgaum

बेळगाव लाईव्ह :माझा राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी येत्या 15 जून 2026 रोजी समाप्त होत असून केंद्रीय भारतीय जनता पक्ष निवड समितीने माझ्या जागी धारवाडचे एम. नागराज निवड केली आहे. त्याचप्रमाणे विधान परिषद सदस्यत्वासाठी बेळगावचे लिंगराज पाटील व म्हैसूरचे रघु कौटिल्य यांची निवड केली आहे, अशी माहिती राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी दिली

बेळगाव घरामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी म्हणाले की, माझ्या राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी येत्या 15 जून रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे माझ्या जागी केंद्रीय भारतीय जनता पक्ष निवडणूक समितीने धारवाड येथील सामान्य कार्यकर्ता एम. नागराज यांची राज्यसभा सदस्यत्वासाठी निवड केली आहे.

माझा कालावधी समाप्त होताच नागराज राज्यसभा सदस्य म्हणून कार्यरत होतील. पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्याच्याशी मी कटिबद्ध असल्यामुळे राज्यसभा सदस्यत्वासाठी त्यांनी केलेल्या निवडीचे मी स्वागत करतो. कारण यामुळे उत्तर कर्नाटकाला राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्याशिवाय गेली अनेक वर्ष पक्षाची निष्ठेने सेवा केलेल्या एम. नागराज यांना त्यांच्या कार्याचे फळ मिळाले असून पक्षाच्या वरिष्ठांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. तसेच नागराज यांना संपूर्ण सहकार्य करण्याची हमी देतो.

 belgaum

राज्यसभे व्यतिरिक्त विधान परिषदेच्या दोन जागांसाठी देखील उमेदवारांची निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी एक माझ्या सोबत कार्य केलेले जुने कार्यकर्ते लिंगायत समाजाचे लिंगराज पाटील हे होत, ज्यांनी हुबळी -धारवाड अर्बन डेव्हलपमेंट बोर्डाचे चेअरमन पद भूषवले होते. मागासवर्गीय विभागातून निवडले गलेले दुसरे उमेदवार मडिवाळ समाजातील रघु कौटिल्य हे आहेत.

ज्यांना म्हैसूर विभागातून निवडण्यात आले असून सध्या ते ओबीसी मोर्चाचे राज्य अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या पद्धतीने भाजप निवड समितीने राज्यसभेसाठी एकाची आणि विधान परिषदेसाठी दोघाजणांची निवड केली आहे. या निवडीला राज्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने मी पाठिंबा देऊन स्वागत करतो असे सांगून इराणा कडाडी यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाच्या कालावधीत कोरोना काळापासून आजपर्यंत केलेल्या कार्याची माहिती दिली. पत्रकार परिषदेस बेळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.