Tuesday, July 23, 2024

/

‘नो पेट्रोल विदाउट हेल्मेट’ कितपत योग्य?

 belgaum

पोलिस प्रशासनांने ‘हेल्मेट शिवाय पेट्रोल नाही’ अशी एकतर्फी मोहीम शहरातील पेट्रोल पंपावर हाती घेतली आहे ती पूर्ण पणे चुकीची असून हा नियम पोलीस खात प्रभावी पणे राबवू शकत नाही  हे त्यातून स्पष्ट होते.
अलीकडेच कर्नाटक उच्च न्यायालयाने हेल्मेट सक्तीचे योग्य आहे असा निर्वाळा दिल्याने पोलीस खात्याला या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास वेगळं बळ मिळाले आहे वास्तविक रित्या राज्य सरकराने हेल्मेट वापरणे दुचाकी स्वारांना सक्तीचं केलेलं आहे मात्र काही ठिकाणी हेल्मेट वापरण्यास दुचाकी स्वारांनी विरोध केला त्यामुळे  सक्तीची तीव्रता कमी झाली.

petrol

अलीकडेच कर्नाटक उच्च न्यायालयाने हेल्मेट वापर  सक्तीने करण्याबाबत चा निर्णय दिल्याने पोलीस खात्याने त्याची अंमलबजावणी अगदी कडक करण्याचा दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. इतकेच नव्हे तर या नियमाचा भंग करणाऱ्या दुचाकी स्वारांना चौका चौकात अडवून त्यांच्या विरुद्ध खटले भरून दंड आकारण्यात येत आहे.काही वेळा काही ठिकाणी पोलीस चिरीमिरी घेऊन दुचाकी स्वारांची सुटका करताना दिसतात. दर दोन ते तीन महिन्यातून एकदा पोलीस खात्याने प्रसिद्धी पत्रक काढून किती दंड वसूल केला गेला याची पाठ स्वतःच थोपटून घेतात.इतकं सगळं रामायण करून देखील पोलिसांना उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी परिणाम कारक रित्या करता येत नाही हेच पोलिसांचं अपयश आहे.

‘नो पेट्रोल विदाउट हेल्मेट’ अशी मोहीम राबवून पोलिसांनी हेल्मेट सक्ती योग्य प्रमाणे लागू करण्यात आपणच अपयशी ठरल्याचे अप्रत्यक्ष रित्या कबूल केलं आहे हेच यातून स्पष्ट होत आहे.यासाठीच पेट्रोल पंप मालकांना वेठीस धरलं आहे.बेळगाव live कडे मिळालेल्या माहितीनुसार शहरातील पेट्रोल मालकांची संमती घेतली की नाही या विषयी साशंकता व्यक्त होत आहे अद्याप पेट्रोल पंप मालकांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.पेट्रोल पंपावर हेल्मेट सक्ती करा असा कोणताही अधिकृत आदेश सरकारने दिला नसताना देखील पोलिसांनी मनमानी सुरू केली आहे. पंपावर हेल्मेट बरोबर लायसन्स,इन्श्युरन्स,एमिशन,रिक्षा मीटर, ओवरलोड,ओव्हर साईज, मोडीफिकेशन,टिनटेड ग्लास,फिटनेस प्रमाण पत्र  देखील पंपावर सक्तीचं करा अशी देखील नवी मागणी पुढे आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.