belgaum

गरजू रुग्णासाठी धावला रक्तदाता

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : संकटाच्या क्षणी दिलेली मदत एखाद्याचे आयुष्य बदलू शकते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा बेळगावात आला. खानापूर तालुक्यातील एका गरजू रुग्णाला तातडीने रक्ताची गरज असल्याची माहिती मिळताच, श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ पुढाकार घेत मानवतेचा आदर्श घालून दिला.

श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते शुभम शिंदे (रा. बेळगुंदी) यांनी कोणतीही विलंब न लावता बेळगावातील केएलई रुग्णालयात जाऊन रक्तदान केले. त्यांच्या या रक्तदानामुळे गरजू रुग्णाला वेळेत उपचार मिळण्यास मदत झाली.

या उपक्रमाचे नेतृत्व श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगाव तालुका अध्यक्ष भरत दादा पाटील आणि सचिन कदम (उचगाव) यांनी केले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान, म्हणजेच जीवनदान” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत संघटनेने सामाजिक बांधिलकी जपल्याचे यावेळी अधोरेखित झाले.

 belgaum

रक्ताची गरज कोणालाही, कधीही भासू शकते. अशा वेळी पुढे येऊन केलेले रक्तदान एखाद्या कुटुंबासाठी आशेचा किरण ठरते. श्रीराम सेना हिंदुस्थानच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, अधिकाधिक युवकांनी नियमित रक्तदान करून समाजसेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.