Friday, April 19, 2024

/

देशसेवेत रुजू ३०१ मराठा जवान

 belgaum

एम एल आय आर सी बेळगाव रेजिमिंटल सेंटर ने प्रशिक्षित ३०१ जवान शनिवारी देशसेवेत रुजू झाले. तळेकर ड्रिल मैदानावर शपथविधी समारोह झाला. मेजर रोहित जतैन यांच्या मार्गदर्शनाखाली शिपाई ओमप्रकाश राठोड याने पथसंचलन केले.

सेंटरचे कमांडन्ट ब्रिगेडियर गोविंद Mlircकलवाड यांनी शपथ देवविली, तरुण जवानांनी तिरंगा ध्वजासमोर शपथ घेतली, हा सोहळा अतिशय सुंदर होता.
ब्रिगेडियर कलवाड यांनी सेंटर चा गौरवशाली इतिहास सांगून शिस्त व शारीरिक मजबुतीचे महत्व पटवून दिले. देशाच्या कानाकोपऱ्यात सेवा देण्यास जाणाऱ्या जवानांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रशिक्षण काळात चांगली कामगिरी करणारे शिपाई विनोद मापारी याला कर्नल आर डी निकम ट्रॉफी व नामदेव जाधव मेडल, शिपाई चंद्रकांत मराठे याला सुचा सिंग मेमोरियल कप, कृष्णा पाटील याला कर्नल एन जे नायर मेडल, अनिकेत मोळे याला मेजर एस एस ब्रार मेडल, ओमप्रकाश राठोड याला सुभेदार ऑनररी कॅप्टन केशवराव तळेकर मेडल आणि ड्रिल मधील उत्कृष्ट सहभागाबद्दल ट्रॉफी देण्यात आली.
आर्मीचे अधिकारी आणि जवानांचे पालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.