बेळगाव लाईव्ह :गेल्या 9 महिन्यांत वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेला बेळगाव -बेंगलोर मार्गाच्या तुलनेत बेंगलोर -बेळगाव मार्गावर लक्षणीयरीत्या जास्त प्रवासी प्रतिसाद मिळाला आहे.
गेल्या नऊ महिन्यात बेंगलोरहून बेळगावला 1,04,380 प्रवाशांनी प्रवास केला असून या तुलनेत उलट दिशेने 78,105 प्रवाशांनी प्रवास केला आहे. दुसरीकडे नैऋत्य रेल्वेने मे 2026 मध्ये मालवाहतूक आणि महसूल वाढीत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून या महिन्यात एकूण 770.71 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.
ज्यामध्ये मालवाहतूक महसूल 425.67 कोटी रुपये, तर प्रवासी उत्पन्न 302.34 कोटी रुपये इतके आहे. मे महिन्यात नैऋत्य रेल्वेच्या प्रवासी गाड्यांमधून प्रवास केलेल्या प्रवाशांची संख्या तब्बल 16.37 लाख इतकी आहे.




