belgaum

मच्छे नजीक गांजासह 9.21 लाखांचा मुद्देमाल जप्त; 5 जणांना अटक

0
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह:हलगा -मच्छे बायपास रस्त्यावर मच्छे जंक्शन येथे सार्वजनिक ठिकाणी गांजाची विक्री करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला बेळगाव सीसीबी पोलिसांनी काल अटक करून त्यांच्या जवळील 1,20,000 हजार रुपये किमतीच्या 2.334 किलो गांजासह एकूण 9,21,000 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे कृष्णा उर्फ राजू अशोक रामन्नावर (वय 27, रा. गणपती गल्ली नावगे बेळगाव), प्रमोद सहदेव पाटील (वय 34, रा. पाटील गल्ली रणकुंडये), रामकृष्ण निवृत्ती माहूरकर (वय 32, रा. ता. चंदगड, जि. कोल्हापूर महाराष्ट्र), परशुराम कल्लाप्पा बुगडीकट्टी (वय 25, रा. जयनगर मच्छे) आणि जानू विठ्ठल गावडे (वय 45, रा. कुंभार्डा, ता. खानापूर जि. बेळगाव) अशी आहेत.

हे सर्वजण काल मंगळवारी हालगा -मच्छे बायपास रस्त्यावरील मच्छे जंक्शन येथे सार्वजनिक ठिकाणी थांबून स्वतःच्या लाभासाठी गांजा या अमली पदार्थाची विक्री करत होते.

 belgaum

याबाबतची माहिती मिळताच बेळगाव सीसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून सर्व आरोपींना ताब्यात घेतले.

तसेच त्यांच्या जवळील 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा 2 किलो 334 ग्रॅम गांजा, 7 लाख रुपये किमतीची एक्सएलआर कारगाडी, 30 हजार रुपये किमतीची होंडा डिओ मोटरसायकल, 25 हजार रुपयांचे 5 मोबाईल फोन आणि रोख 46 हजार रुपये असा एकूण 9 लाख 21 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपीं विरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

कारमध्ये दारू पिणाऱ्या दोघा जणांसह एका गांजाबाजाला अटक

शहरात सार्वजनिक ठिकाणी कारगाडीमध्ये बसून दारू पिणाऱ्या दोघाजणांसह गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करून वावरणाऱ्या एकाला काल मंगळवारी पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे गिरीश नागनाथ पाटील (वय 39, रा. नागिनहळळी, कलबुर्गी), शिवानंद शांतप्पा मुचळंबी (वय 50,रा. रामतीर्थनगर बेळगाव) आणि उम्राज इब्राहिम कडगावे (वय 31, रा. वीरभद्रनगर बेळगाव) अशी आहेत. यापैकी गिरीश आणि शिवानंद हे दोघे सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे गुन्हा आहे हे माहीत असतानाही रामतीर्थनगर क्रिकेट मैदानाजवळ सार्वजनिक ठिकाणी कार गाडीमध्ये दारू पीत बसले होते. त्यावेळी माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून दोघांनाही ताब्यात घेते. त्याचप्रमाणे आरोपींनी दारू पिण्यासाठी वापरलेली 10 लाख रुपयांची किया कारगाडी जप्त केली. याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दुसऱ्या प्रकरणात उम्राज हा बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाजवळ सार्वजनिक ठिकाणी अनैसर्गिक वर्तन करत असल्याचे निदर्शनास येताच मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हुसेनसाब केरूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपीने कोणतीतरी नशा केल्याचे लक्षात आल्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्याने गांजा या अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आरोपी विरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.