belgaum

आदित्यराज कॅपिटल प्रा. लि.वर धाड, चौकशी सुरू

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :ठेवीदारांची फसवणूक केली जात असल्याच्या आरोपावरून बेळगाव शहरातील आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेवर आज बेळगाव उपविभागीय अधिकारी शरण नायक यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांच्या पथकाने धाड टाकली.

शहरातील भाग्यनगर येथील उपरोक्त संस्थेकडून कोणत्याही सरकारी नियमांचे पालन न करता, कोणतीही खबरदारी न घेता मोठ्या व्याजाचे आमिष दाखवून सार्वजनिकांकडून ठेवी गोळा करून त्यांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप असल्याचे कळते.

यासंदर्भात आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या विरोधात केपीआयडी आणि बड्स कक्षात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज भाग्यनगर येथील सदर संस्थेच्या कार्यालयावर धाड टाकून कागदपत्रांची तपासणी केली.

 belgaum

टिळकवाडी पोलिसांच्या बंदोबस्तात ही धाडीची कारवाई करण्यात आली. संस्थेच्या आर्थिक व्यवहारासह ठेवीदारांच्या पैशासंदर्भात अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. कागदपत्रांची तपासणी आणि चौकशीअंती या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती उपलब्ध होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.