belgaum

यासाठी सीबीआयने केली आरएमएस मध्ये चौकशी

0
Rms belgaum
 belgaum

बेळगाव लाईव्ह : देशातील सहा राष्ट्रीय मिलिटरी स्कूल पैकी एक असलेले बेळगावच्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये एका प्रकरणात सीबीआयच्या पदकाने चौकशी केलेली आहे.

राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, बेळगाव येथे कथित आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) पथकाने बुधवारी चौकशी केली. उपअधीक्षक (डीएसपी) यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 12 अधिकाऱ्यांचे पथक तसेच लष्करी गुप्तचर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शाळेत भेट देऊन विविध नोंदींची तपासणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही चौकशी खरेदी प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि गेल्या काही वर्षांतील निधीच्या संभाव्य गैरवापराच्या आरोपांशी संबंधित आहे. राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे माजी विद्यार्थी मंजनाथ बनशंकरी यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

 belgaum
Rms belgaum

तक्रारीमध्ये शाळेच्या गेल्या पाच ते आठ वर्षांतील आर्थिक व प्रशासकीय कामकाजाची स्वतंत्र चौकशी करण्याची, नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG) यांच्याकडून लेखापरीक्षण करण्याची तसेच आर्थिक नोंदी सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सीबीआयने प्राथमिक तपास सुरू केल्याचे समजते.

news source :TOI

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.