Friday, March 29, 2024

/

भारतमाला प्रकल्पातून बेळगावला मिळणार रिंगरोड

 belgaum

BHaratmalaहैद्राबाद ते पणजी असा इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्प लवकरच पुढे येत आहे. या कॉरिडॉरशी मेहबूबनगर, देवसुगुर,लिंगसुगुर, बागलकोट आणि बेळगाव ही शहरे जोडली जाणार असून त्यासाठी बेळगाव शहराभोवती रिंगरोड केला जाणार आहे.
बेळगाव शहर हे या कॉरिडॉर चे मुख्य जोडणी केंद्र होणार आहे, यामुळेच शहराभोवती फिरणाऱ्या रिंगरोडची गरज निर्माण झाली आहे. भारतमाला योजनेतून हा कॉरिडॉर होणार आहे, पहिल्या टप्प्यात २४००० किमी चे काम होईल, यात भर म्हणून भारतमाला परियोजनेच्या पहिल्या टप्प्यात आणखी १०००० किमी असे एकूण ३८००० किमीची कामे होणार असून त्यासाठी ५ लाख ३५ हजार कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.२०१७-१८ मध्ये कामाला सुरुवात करून २०२१-२२ पर्यंत ते पूर्ण करण्याची योजना आहे.
बेळगाव शहराने आजवर रिंगरोड ची नुसती स्वप्ने बघितली आहेत. फक्त आराखडे बनवण्यापलीकडे कामे झाली नव्हती, मात्र आता भारतमाला परियोजनेच्या आराखड्यात पहिल्या टप्प्यात रिंगरोड मार्गी झाल्यास २०१८ डिसेंम्बर पर्यंत रिंगरोड उपलब्ध होईल, अशी आशा आहे.

1 COMMENT

  1. Formation of Ring Road is Very happy news for Belgaum people, so that traffic wouldn’t be jeopardized.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.