Sunday, April 28, 2024

/

तर जनता १ नोव्हेंबर यशस्वी करेल …

 belgaum

पोलिसांनी सर्वाना एक सारख्या पद्धतीनं वागवावं, देशात ज्या लोकांनी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय त्यांना सुद्धां आमच्याच लेवल ला आणावं त्यावेळेला विचार करू एकीकरण समिती कोणत्याही पद्धतीचा ३० लाखांचा हमी बॉंड देणार नाही हवं तर कारवाई करा नेत्या शिवाय जनता काळा दिन पाळेल, सुतक दिन यशस्वी करून दाखवेल अशी ठाम भूमिका मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी घेतली आहे.

काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती समिती आणि मराठी भाषिक युवा आघाडीच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त सीमा लाटकर आणि अमरनाथ रेड्डी यांची भेट घेऊन सोशल मिडिया वर काम करणाऱ्या युवकांवर घातलेल्या केस आणि काळा दिवस आयोजनाची माहिती देणाऱ्या समिती नेत्यांना दोन भाषिकात तेढ निर्माण केल्या बद्दल नोटीस दिल्यासंदर्भात चर्चा केली.यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. समिती नेत्यांनी  कोणत्याही स्थितीत ३० लाखांचा हमी बॉंड देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

टिपू जयंतीच्या पार्श्वभूमीवर मी सहभागी होणार नाही अशी जाहीर भूमिका घेत  राज्यात Black day mesबेळगावच्या खासदारांनी दोन धर्मात तेढ निर्माण केली आहे, त्यांच्यावर का कारवाई होत नाही ?असा सवाल करत कॉंग्रेसने भाजपच्या नोट बंदी आणि काळा पैसा यावर काळा दिन पाळायचं पहिलं वर्ष आहे, आमचा काळा दिन ६२ वर्ष पूर्वी पासून सुरू आहे , आमच्या बाबतीत दुजाभाव का ?असा देखील प्रश्न उपस्थित केला आहे. नोटीसी देऊन दडपशाही करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे अटक करा जनताच काळा दिन पाळेल अस देखील ते म्हणाले

 belgaum

यावेळी मागील वर्षी काळ्या दिनाच्या सायकल फेरीत पोलिसांच्या गाड्यावर दगडफेक होणं चुकीच आहे असं मत एसीपी अमरनाथ रेड्डी यांनी मांडलं तर मागील वर्षीच्या चुका व कारवाई विसरा या वर्षी काय करावं यावर सूचना करा एफ एस एल मधून तपास केल्यावरच सोशल मिडिया काम केलेल्या युवकावर कारवाई केली आहे अशी माहिती सीमा लाटकर यांनी समितीच्या शिष्टमंडळाला दिली.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.