Friday, April 26, 2024

/

ट्रॅफिक निरीक्षकाची अशीही गांधीगिरी …

 belgaum

TRaffic cpiशहरातील भाजी मार्केट जवळील नेहमी होणारी वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी बेळगाव उत्तर रहदारी पोलीस स्थानकाचे निरीक्षक आर आर पाटील यांनी त्यावर एक नामी उपाय शोधलाय भाजी मार्केट मधील व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांना गुलाबाची फुल देऊन ट्रॅफिक कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

आर आर पाटील यांनी ट्रॅफिक पोलीस निरीक्षक पदाचा पदभार नुकताच स्वीकारला आहे त्यांनी भाजी मार्केट मध्ये भाजी घेऊन येणाऱ्या वाहनांच्या बेशिस्तीमूळ ट्रॅफिक जॅम होत असल्याचं ओळखून व्यापारी आणि वाहन चालकांना गुलाबच फुल देऊन ट्रॅफिक शिस्त लावा अशी विनंती केली आहे.

ओल्ड पी बी रोड वर भाजी मार्केट मूळ नेहमी जॅम सदृश्य स्थिती असते येथील जॅम चा फरक सर्व शहरात पडत असतो त्यामुळं रहदारीला शिस्त लावण्यासाठी भाजी मार्केट व्यापाऱ्यांना पहिल्या दिवशी गुलाब पुष्प गुच्छ देऊन गांधी गिरी केली आहे. उद्या पासून भाजी मार्केट व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानाला येणाऱ्या दुचाकीना पार्किंग शिस्त लावली नाही तर पोलीसगिरी दाखवण्यात येईल असा इशारा देखील दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.