मानसिक धक्का- वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

0
 belgaum

dr sonali sarnobatरोजची मेडिकल प्रॅक्टिस म्हणजे एक नवीन आव्हान आणि अनुभवांची रेलचेल असते. मानवी स्वभावाचे अनेक नमुने, कंगोरे पहायला, अभ्यासायला मिळतात. येणारी प्रत्येक व्यक्ती अभ्यासायला गेल्यास एक वल्ली म्हणूनच समोर येते. लिहायला गेलं तर अशा अनेक नमुनेदार व्यक्तींची व्यक्तीचित्रे लिहून एक जाडजूड पुस्तकच तयार होईल. होमिओपॅथिची मटेरियामेडिका म्हणजे औषध कोष अभ्यासताना नेहमी एक लक्षण समोर यायचे. ’’एलमेंट्स फ्रॉम एक्साइटमेंट,’’ सॅडनेस, इमोशनल ड्रॉमा, डेथ ऑफ निअर अँड डिअर पर्सन इ. इ. त्यावेळी या लक्षणाकडे फारसे लक्ष जायचे नाही. परंतु रोजच्या आयुष्यात मात्र या लक्षणाचे महत्व खूप आहे. अक्षरशः एखादी पूर्ण केस या लक्षणावर उभी राहते.

गोव्यात राहणारी अठरा वर्षांची सीमा, (नाव बदलले आहे.) चौदाव्या वर्षी निसर्गनियमानुसार तिची मासिकपाळी चालू झाली. नंतर कायम व्यवस्थित, वेळेवर होत असे. पण अठराव्या वर्षी तिची पाळी अचानक बंद झाली. हरतर्‍हेची औषधे झाली. अशीच दोन वर्षे गेली. हार्मोनची औषधे झाली. अशीच दोन वर्षे गेली. हार्मोनची औषधे घेतली की पाळी व्हायची. नाहीतर व्हायचीच नाही. सोनोग्राफीमध्ये पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोमचे ( निदान झाले. होमिओपॅथी औषध तरी घेऊन पाहू म्हणून सीमाने होमिओपॅथिक  औषधे घेऊन पाहिली. चार महिने फरक पडला परंतु पुन्हा तेच. सीमाने ’खजाना’ मधील आरोग्यमंत्र मधील झउजऊ चा लेख वाचला आणि बेळगाव गाठले. तिची सगळी हिस्टरी घेऊन झाली. रिपोर्टस् पाहून झाले. पण नेमका दुवा सापडेना. सोबत तिची बहीण आलेली. सहज विचारलं, तुझे आईवडील कुठे आहेत? तर सीमा शांत! बहीण म्हणाली, सीमा अठरा वर्षांची झाली त्या वाढदिवसादिवशीच आईवडिलांचा अपघात होऊन दोघेही एकाच वेळी गेले. सीमा आम्हा दोघी बहिणीकउेच आलटून, पालटून राहते, भाऊ नाही! विचार केला तेव्हा झउजऊ ची सुरूवात आणि हा मानसिक धक्का यांची वेळ जुळत होती. मानसिक धक्क्यामुळे आणि आपल्या भविष्याच्या काळजीमुळे सीमाची हार्मोनल सिस्टीम पूर्ण कोलमडून गेली होती. हे लक्षण सरकत समोर चमकून गेले. मानसिक धक्क्यामुळे पाळी बंद होणे हे लक्षणही औषधकोषात लगेच मिळाले. केसचा मूळ धागा मिळाल्यामुळे केसचा अभ्यास सोपा झाला. सीमाला ते विशिष्ट औषध विशिष्ट मात्रेत दिल्यावर कोणत्याही हार्मोनशिवाय तिची पाळी नियमित सुरू झाली.
दुसरी केस प्रदीप यांची. वय साधारण ४५ वर्षे. नोकरीमध्ये यांचे प्रमोशन नाकारून दुसर्‍याच कुणाला देण्यात आले. अपेक्षाभंगाचे दुःख पचवता न आल्यामुळे बी. पी वाढणे, चक्कर येणे, छातीत धडधडणे असे प्रकार होत असत. टेन्शन कमी करण्याची, उत्साहवर्धक, निराशानाशक, झोपेच्या गोळ्या अशी औषधे, रक्तदाबाची औषधे घेऊनही फरक पडत नसे. अपेक्षाभंगाचे दुःख पचवता न आल्याने ती भावना अशी आजाराच्या स्वरूपात बाहेर पडत होती. तसे औषघ दिल्यावर प्रदीपना आजार कमी कमी होत असल्याचे कळू लागले. शिवाय मन उत्साही राहू लागले. अँटीडिप्रेसंटपेक्षा होमिओपॅथिक गोळ्यांनी मूळचा आत्मविश्‍वास त्यांना परत मिळाला.
प्रत्येक आजारामागे काहीतरी मानसिक कारण असते. होमिओपॅथीमध्ये अशा मनोशारीरिक आजारांवर बरेच संशोधन झालेले आहे. तज्ज्ञांकडून या कारणांचा खुबीने विचार करणे आवश्यक असते. रूग्णाशी संवाद जो आजकाल खूप दुर्मीळ होत आहे, त्यावरच उपचाराचे यश अवलंबून असते.
या संवादामुळे, आपुलकी दाखवल्याने, रुग्णाच्या वयानुसार आदर दाखवल्यामुळे रूग्ण व डॉक्टर यांच्यात जिव्हाळा निर्माण होतोच शिवाय रूग्ण डॉक्टरवर भरवसा ठेवून आपल्या व्यथा निर्धास्तपणेक डॉक्टरांसमोर मांडतात अशाने रूग्णाला समजावून घेणे सोपे होते. अनेकवेळा आजाराची कारणेसुध्दा या संवादामधूनच आढळून येतात.
अति उल्हसित झाल्यामुळे, अतिव दुःखामुळे, अपेक्षाभंगामुळे, दुसर्‍याकडून अपमानित झाल्यामुळे अनेक मानसिक- शारीरिक आजार जडू शकतात. फक्त होमिओपॅथीमध्येच अशा लक्षणांचा, कारणांचा, आजारांचा पूर्ण अभ्यास झालेला असल्यामुळे रूग्णांना निश्‍चित फायदा मिळतो. म्हणजे अमुक कारणामुळे आजार होणे. ते कारण शोधून काढणे हेच महत्वाचे

bg

डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक 08312431362
सरनोबत क्लिनिक 08312431364

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.