Wednesday, May 8, 2024

/

चीनमध्ये मृत्यूनंतरही नोबेल विजेत्याची अवहेलना….

 belgaum

WRite up on chinaचीनमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत लोकशाहीसाठी लढा देणारे लेखक, विचारवंत आणि नोबेल विजेते ल्यु झिआबो यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूनंतरही ल्यू यांना चिनी सरकारनं मानवतेची वागणूक दिली नाही.अबोटाबादमध्ये ओसामाला ठार मारल्यानंतर त्याला गुप्त पद्धतीने खोल समुद्रात दफन करण्यात आलं होतं. चीन सरकारन ल्यू यांच्यासंदर्भात तसंच काही केलं.ल्यु यांचा अत्यसंस्काबद्दल प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली. अनेक चिनी माध्यमांनी देशातल्या पहिल्या आणि एकुलत्या एक नोबेल विजेत्यांची दखलही घेतली नाही. ल्यु यांना दफन केल्यास ती जागा अनेकांसाठी प्रेरणा स्थळ होण्याची शक्यता होती, त्यामुळे दफन करण्याऐवजी अग्नीसंस्कार करावे असा दबाव चिनी प्रशासनाने ल्यु यांच्या कुटुंबियांवर टाकला. महासत्ता होण्याकडे वाटचाल करणाऱ्या आणि प्रचंड लष्करी आणि आर्थिक ताकद असणाऱ्या चीनने ल्यु यांच्यासारख्या विचारवंतांची एवढी धास्ती का घ्यावी हे जगाला पडलेलं कोड आहे.

आम्ही कशे पारदर्शी आहोत हे भासवण्यासाठी प्रशासनानं ल्यु यांच्या भावाला सरकारी प्रेसपुढं उभं करून त्यांच्याकडून काही स्टेटमेंट करून घेतले.” माझ्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करण्यात यावेत, आणि रक्षा नदीत विसर्जित करावी अशी ल्यू यांची अंतिम इच्छा होती. चिनी प्रशासनानं ल्यु यांची तुरुंगात यांची चांगली काळजी घेतली अस ते म्हणाले.

ल्यू यांच्या अंत्यविधीला त्यांची पत्नी, भाऊ आणि परिवारातील काही मोजक्या व्यक्तींना सहभागी होण्यास सरकारने परवानगी दिली होती. या अत्यविधीला उपस्थित राहण्याची परवानगी काही नोबेल विजेत्यांनी चिनी सरकारकडे मागितली होती. मात्र ल्यू यांच्या परिवाराकडून तुम्हाला काही रीतसर आमंत्रण दिलं गेलेलं नाही असं थातुरमातुर कारण देत चीन सरकारनं व्हिसा द्यायला नकार दिला. चीनमध्ये साधारपणे मेल्यानंतर दफन करण्याची परंपरा आहे, अग्नीसंस्कार फारशे होत नाही.

 belgaum

ल्यु यांच्या निधनावर नागरिकांच्या प्रतिक्रिया उमटू नये याची दक्षता सरकारने घेतली होती. सोशल माध्यमांवर सरकारची करडी नजर होती, चिनी नागरिक वेबो नावाची एक मायक्रोब्लॉगिंग साईटचा वापर करतात. या साईटवर सरकारचा कंट्रोल आहे. ल्यू यांच्याबद्दल सोशल माध्यमांवर प्रतिक्रिया उमटू नयेे याची काळजी सरकारने घेतली. RIP आणि मेणबत्तीच्या इमोजीवर बंदी घातली गेली. सरकारी वरवंट्याच्या भीतीमुळे अनेकांनी ल्यू यांचं प्रत्यक्ष नाव न घेता सिम्बॉलीक व्यक्त होणे पसंत केलं. काही अनेकांनी चॅटिंग ग्रुपवर रिकाम्या खुर्चीचा फोटो टाकत आपल्या भावना व्यक्त केल्या.तर काही जणांनी ” It must be to mark the exit of a hero,” असं लिहिलं. “The heavens are also moved.”
Heaven is watching,” असं लिहून काहींनी अप्रत्यक्षपणे चिनी सरकारवर टीका केली.

चीनमध्ये सर्च इंजिनवर ह्युमन राईट आणि ल्यु अशे काही शब्द टाकून सर्च केल्यास त्याचा शून्य रिझल्ट येतो.कारण सरकारने हा कंटेन्ट ब्लॉक केलाय.

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.