Thursday, May 30, 2024

/

कडक बंदोबस्तात सर्व मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी काल मंगळवारी मतदान प्रक्रिया सुरळीत शांततेने पार पडल्यानंतर बेळगाव व चिकोडी मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांमधील मतदान यंत्रे शहरातील आरपीडी -जीएसएस कॉलेजमधील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितपणे हलविण्यात आली असून या ठिकाणी सध्या कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी टिळकवाडी येथील आरपीडी -जीएसएस कॉलेजमध्ये स्ट्रॉंग रूमची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी सर्व त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

परवानगीशिवाय मुंगीलाही शिरकावा मिळू नये अशी दक्षता घेत खिडक्या आणि दरवाजे प्लायवूडच्या फळ्या मारून स्ट्रॉंग रूम सर्व बाजूने बंदिस्त करण्यात आले आहे. बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदार संघामध्ये काल मंगळवारी सायंकाळी मतदान प्रक्रिया पार पडताच कडक सुरक्षा व्यवस्थेत सर्व मतदान केंद्रांमधील मतदान यंत्रे (ईव्हीएम मशीन्स) स्ट्रॉंग रूममध्ये आणून ठेवण्यात आली आहेत.Rpd

 belgaum

सर्व मतदान यंत्रे जमा झाल्यानंतर स्ट्रॉंग रूम टाळे ठोकून सील बंद करण्यात आले असून आता येत्या 4 जून रोजी मतमोजणी वेळीच हे टाळे उघडले जाणार आहे.तोपर्यंत स्ट्रॉंग रूम परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसह पोलिस आणि निमलष्करी जवानांचा रात्रंदिवस जागता पहारा राहणार आहे. अधिकृत परवानगीशिवाय कोणालाही स्ट्रॉंग रूम परिसरात फिरकू दिले जाणार नाही.

राज्यातील बेळगाव, चिक्कोडीसह 14 मतदार संघांमधील लोकसभा निवडणुकीचे मतदान काल मंगळवारी सायंकाळी सुरळीत शांततेत पार पडले. बेळगाव आणि चिक्कोडी या दोन्ही मतदारसंघांमध्ये यावेळी मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली हि विशेष बाब असून राज्यातील दोन माजी मुख्यमंत्री, एक माजी उपमुख्यमंत्री, सात विद्यमान खासदार, चार मंत्र्यांची मुले यासह एकूण 227 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे.

राज्यात विक्रमी मतदानाची नोंद करणाऱ्या चिक्कोडीमध्ये सर्वाधिक 82.21 टक्के मतदान यमकणमर्डी येथे तर बेळगावमध्ये सर्वाधिक 76.88 टक्के मतदान बेळगाव ग्रामीणमध्ये नोंदविले गेले. बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघात काल सुरुवातीपासून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 71.49 टक्के मतदान झाले जे मागील 2019 मध्ये झालेल्या 66.59 टक्के मतदानापेक्षा 4 टक्के जास्त आहे. संपूर्ण राज्यात चिक्कोडी मतदारसंघात विक्रमी 78.63 टक्के इतके मतदान झाले आहे. या पद्धतीने बेळगावातील 13 व चिक्कोडीमधील 18 अशा एकूण 31 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.

बेळगाव जिल्ह्यात मोडणाऱ्या मतदार संघाचा तपशीलवार निवडणूक निकाल (अनुक्रमे लोकसभा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ, एकूण मतदार, पुरुषांचे मतदान, महिलांचे मतदान, इतरांचे मतदान, एकूण मतदान आणि एकूण टक्केवारी यानुसार) पुढीलप्रमाणे आहे.
बेळगाव मतदार संघ : अरभावी – 258388, 95074, 90752, 0, 185826, 71.92%. गोकाक – 260398, 92614, 93079, 3, 185696, 71.31%. बेळगाव उत्तर – 266084, 83778, 85004, 2, 168784, 63.43%. बेळगाव दक्षिण – 258265, 86880, 84911, 7, 171798, 66.52%. बेळगाव ग्रामीण – 267772, 104088, 101765, 2, 205855, 76.88%. बैलहोंगल – 198485, 74925, 71116, 1, 146042, 73.58%. सौंदत्ती यल्लमा – 204639, 80420, 76598, 1, 157019, 76.73%. रामदुर्ग – 209757, 79682, 74689, 4, 154375, 73.60%. एकूण मतदार 1923788 पैकी पुरुष मतदान 697461, महिला मतदान 677914, इतर मतदान 20, एकूण मतदान -1375395, टक्केवारी 71.49.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.