Sunday, April 28, 2024

/

पाणी बचतीचा संदेश घेऊन जाताना…

 belgaum

AARti bhandareतशी ती पेशाने (dentist) डॉक्टर, बेळगावातील एका मोठ्या उद्योजक परीवारातील सून मात्र केवळ समाजाच देणं ,एक जबाबदारी ,समाजकार्याची आवड म्हणून पर्यावरण आणि पाणी बचती साठी ती काम करत आहे . एक महिला म्हणून हे योगदान दखल घेण्यासारखं आहे म्हणूनच बेळगाव live ने त्यांची खास मुलाखात घेतली आहे .

आरती भंडारे अस त्याचं नाव असून त्या बेळगाव शहरातील विविध स्कूल  कॉलेज विविध संस्था मधून पाणी बचती साठी लेक्चर देत असतात. घरगुती किंवा पावसाचे पाणी कश्या पद्धतीने वाचवू शकतो ,त्याचा योग्य वापर कसा करू शकतो याबद्दल त्याचं मार्गदर्शन सुरु असतं. प्रत्यक्षात काम करण्यापेक्षा समजावून सांगितल्यावर अधिक परिणाम कारक जनजागृती होऊ शकते अस त्यांचं मत आहे म्हणून त्यांनी शाळा कॉलजीस ,सोशल क्लब ,महिला मंडळ संघटना येथे व्याख्यान देत यावर कार्य सुरू केलय

 belgaum

ऑगष्ट २०१५ पासून त्यांनी पाणी बचतीवर सार्वजनिक गणेश मंडळात बॅनर लावत मार्गदर्शन करायला सुरुवात केली होती , त्यांची दखल महा पालिका पाणी पुरवठा अभियंता प्रसन्न मूर्ती यांनी घेतली त्यांना या उद्देश्या साठी शाळा कॉलेज मध्ये व्याख्यान द्यायला  मदत केली . सोशल मिडीयावर अनेक व्याख्यानाची माहिती मिळाल्यावर शहरातील शाळा कॉलेज ,रोटरी क्लब, लेडीज क्लब इनर व्हील मिड टाउन सारख्या संस्थांना व्याख्यान देत पाणी बचतीवर माहिती सांगितली आहे .

लहान मुलांना वेगळी शिकवण, घरघुती महिलांना पाणी बचतीच्या वेगळ्या टिप्स, सोशल ग्रुप महिला संघटनाना सांगायचे टिप्स वेगळ्या असतात अस देखील त्या बेळगाव live दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या …रोटरी सारखी संस्था पाणी बचती साठी पैसे जमा करू शकते लहान मुल ते काम करू शकत नाहीत मुल त्यांच्या घरी ते पाणी कस वाचवू शकतात एवढा दुष्काळ का पडला यावर ते कस लढू शकतात यावर मुलांना माहिती  तर महिला किचन मध्ये जास्त  पाणी वेस्ट करतात किचन मध्ये कश्या पद्धतीने पाणी वाचवता येतं याची सोपी नीट नेटकी माहिती महिलांसाठी ..तर सोशल क्लब महिलांना प्रोजेक्ट प्रेजेन्टेशन दाखवत असतो ते पैसे लावतील त्यातून उत्पन्न देखील घेतील अश्या पद्धतीने पाणी वाचवण्याचा कार्य माहिती सुरु असते असे त्या म्हणाल्या.

रेन हार्वेस्टिंग बद्दल पुस्तकात एका धड्यात जेवढी माहिती तेवढीच माहिती आम्हाला उप्लब्ध होती पाऊस आल्यावर पाणी कुठं जातं कसं वेस्ट होतं ?हे अडवून कमीत कमी पैश्यात त्याचा जास्तिस्त जास्त कसा वापर करू शकतो यासाठी विनायक नायकोजी आणि युवकानी live मॉडेल तयार करून घेतलं अनेक प्रदर्शनात कॉलेज शाळा मधुन तो दाखवला त्याचा परिणाम असा झाला कि बेळगावातील अनेक शाळांनी आत्मसात केलाय उषाताई गोगटे शाळा तसेच शाळेत ऐकून अनेक पालकांनी आपल्या घरी देखील हा प्रोजेक्ट केलाय . आम्ही जुन ते सप्टेंबर पर्यंत रेन हार्वेस्टिंग बद्दल जनजागृती करत असतो , घरी रेन हार्वेस्टिंग कस करू शकतो याचा प्रोमो विडीयो आम्ही तयार केलाय ते सोशल मिडिया व अन्य माध्यामातून जन जागृती करत असतो, पहिला स्वतःच्या घरी त्यांनी रेन हार्वेस्टिंग सुरू केली मग इतरांना त्या संदेश देत आहेत असे ही त्यांनी सांगितले.

पाणी वाचवण्याची अनेक उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत त्या उपकरणा बद्दलही त्या जनजागृती करत असतात मात्र एकूणच पाणी वाचवा हि काळाची गरज आहे  म्हणून save water save life हा नारा त्या देताना दिसत आहेत. त्यांच्या कार्यात बेळगाव live नक्कीच सहभागी होणार आहे.

व्याख्याना साठी संपर्क
आरती भंडारे
9902528342

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.