Sunday, April 28, 2024

/

भर रस्त्यात पी एस आय ची पत्रकाराला मारहाण

 belgaum

khanapur psi aawatiखानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक यु एस आवटी यांनी भर रस्त्यात एका पत्रकाराला बेदम मारहाण केली आहे.

खानापूर येथील प्रजावाणी या कन्नड दैनिकाचे रिपोर्टर प्रसन्न कुलकर्णी हे बेकवाड ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष निवडीच्या कव्हरेज साठी गेले असता त्यांना वयक्तिक द्वेष ठेऊन उपनिरीक्षका कडून  बेदम मारहाण करण्यात आली आहे. कुलकर्णी यांनी या अगोदर नंदगड पोलीस स्थानकातील अनेक गैर कारभाराचा भांडाफोड केला होता सोमवारी बेकवाडला  गेले असता तू बातम्या विरोधात का  छापलास अस विचारत भर रस्त्यात मध्ये मारहाण केल्याची घटना घडली आहे.

जनतेचा रक्षण करणारे पोलीस हे भक्षक झाले की काय अस या घटनेवरून दिसून येतंय कायदा पाळणाऱ्या पोलिसांनी गुंडा प्रमाणे चार चौघात सराईत गुन्हे प्रमाणे पत्रकाराला केलेली मारहाण ही अमानवीय आहे या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे .

 belgaum

या अगोदर खानापूर पी एस आय असतेवेळी आवटी यांना निलंबित करण्यात आले होते आता हे प्रकरण सुद्धा आवटीना शिकण्याची चिन्ह आहेत.केवळ विरोधात बातम्या दिल्या म्हणून  पोलिसांची ही गुंडागिरी  खपवून घेतली जाणार नाही असा चर्चा बेळगावात करताहेत.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.