Sunday, April 28, 2024

/

आत्महत्त्या का?

 belgaum

बेळगाव शहरातून जाणारा रेल्वे ट्रॅक सध्या आत्महत्येचा प्रमुख मार्ग झालाय.जीवन हारणारी मंडळी थेट रेल्वेखाली झोकून देऊ लागलेत.ते जीवन का हरतात ते माहीत नाही, आत्महत्या नेमकी का आणि कशासाठी हे कळत नाही. सामाजिक संघटनांनी आता पुढाकार घ्यायलाच हवा, आत्महत्या घडू नयेत म्हणून प्रयत्न करावेत ही गरज आहे.

Railway track

जानेवारी २०१७ ते आजतागायत बेळगाव रेल्वे पोलिसांच्या हद्दीतच  रेल्वे ट्रॅकवर  ३७ मृत्यू झालेत. त्यापैकी २६  आत्महत्या  आहेत.यामध्ये तिघांची ओळख पटली नाही,परीक्षेत नापास झालेले विध्यार्थी, संसारात पिचलेल्या स्त्रिया, प्रेमप्रकरणात अपयश आलेले तरुण तरुणी, आर्थिक प्रकरण अंगलट आलेले किंवा फसवणूक त्यात फसवणूक झालेले असे सगळेजण यात समाविष्ट आहेत. त्यांनी आत्महत्या करण्यासाठी त्यांच्याकडे कारण सबळ होते मात्र त्यांनी निवडलेला मार्ग समर्थनीय नाही. जीवन संपविणे हा मार्ग होऊ शकत नाही हे कुणीतरी सातत्याने सांगत राहण्याची वेळ आलेय.

 belgaum

 

मंगळवारी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केलेल्या दांपत्याने तर आपल्या कमकुवत मनोवृत्तीचे दर्शन घडवलेय. आर्थिक समस्या होती तर ती कालांतराने सोडवता आली असती. नापास होणारे विध्यार्थी तर जेंव्हा आत्महत्या करतात तेंव्हा त्यांना काय सांगावे कळत नाही. एकाने आत्महत्या केली की लगेच मालिका सुरू होते आत्महत्यांची. हे कशाचे द्योतक आहे? त्यांनी स्वतःला सावरून जगत जगत आव्हाने पेलायला पाहिजे होती.

 

कुठल्यातरी कारणाने इज्जत चव्हाट्यावर येते आणि समाजाला तोंड कसे दाखवू असं म्हणत कोणी जीवन संपवतो हे काय चाललंय…? थांबवूया आता हे आत्महत्येचे सत्र. बेळगावात याच विषयावर काम करणाऱ्या नियती फौंडेशन सारख्या संस्था आहेत. मात्र आत्महत्येचा विचार आल्यावर त्यांच्याकडे जायला तरी पाहिजे. अशा संस्थांनी तरी आता रस्त्यावर उतरून जागृती करायला पाहिजे. चर्चा, मार्गदर्शन, जागृती करून आत्महत्या ही प्रवृत्तीचा नाश करायला पाहिजे.

 

क्लेश होणे, त्रास होणे, सहाजिक आहे, पण त्यापुढे मुक्त होण्याचा मार्ग चुकतोय. क्लेश समोर घेऊन दोन हात करून त्यापुढे जे समाधान मिळवले जाईल त्याचे मोल मोठे आहे. प्रत्येकाने स्वतः याचा विचार करावा आणि आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींनाही समजवावे, हीच बेळगाव live ची विनंती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.