Friday, March 29, 2024

/

संपर्क रस्ते बनवून नागरी सुविधा पुरवण्यात महेश नाईक आघाडीवर

 belgaum

माझा प्रभाग माझी कामं

 

mahesh naik worksबेळगाव live चे  नवीन सदर माझा वार्ड माझी कामं …ज्यात नगरसेवकांच्या विकास कामाचा आढावा घेतला जाईल या सदराच्या पहिल्या भागाचे मानकरी बनले आहेत माजी महापौर महेश नाईक.

 belgaum

एक सर्वसामान्य कार्यकर्ता, नगरसेवक ते महापौर असा प्रवास आहे महेश नाईक यांचा. एक लोकप्रतिनिधी म्हणून ते स्वतः आणि त्यांनी केलेली कामे यांचा आढावा घेताना जनतेची काळजी घेण्यासाठी कार्यरत माणूस ही ओळख पटून जाते.

महेश केशव नाईक,
प्रभाग क्रमांक १९,
जन्म तारीख – २५-०१-१९७७ वय ४० वर्ष
मोबाईल-09980709973

शिक्षण :बी काम १ ,
व्यवसाय –केबल ऑपरेटर

निवडणूक माहिती
२०१३ -१४ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून विजयी , माजी उपमहापौर धनराज गवळी यांच्याकडून २००८ मध्ये १०० मतांनी पराभूत तर २०१३ मध्ये धनराज गवळी यांना ९० मतांनी हरविले , २०१३ मध्ये गवळी यांना १०१० मते पडली तर महेश नाईक यांना ११०० मते पडली होती

प्रभाग – जवळपास १५ किमी क्षेत्रफळ व्यापलेला वार्ड ,शहापूर-गोवावेस ,कोरे गल्ली,हट्टीहोळ गल्ली, रामलिंग वाडी,महात्मा फुले रोड, मुचंडी मळा,हुलबत्ते कॉलनी तील काही भाग

शास्त्री नगर-क्रॉस नंबर ५,६,७,८,९,१०पर्यंत गुडस शेड रोड गोडशेवाडी डेक्कन हॉस्पिटल मागे पर्यंत

गोकुळ नगर ,इंदप्रस्थनगर , गोव वेस ते आर पी डी ,सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार पेठ टिळक वाडी ,साई  मंदिर आणि महर्षी रोड

निवडणूक पूर्व जाहिरनामा – वार्डातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविणे , ड्रेनेज काम तसेच संपर्क रस्ते बनवणे

विकास कामे –  ज्या भागात पाईप लाईन नव्हती तिथे नवीन लाइन घालून घेतली ,

मुख्य जलवाहिनी असलेला पाणी पुरवठा प्रेशर वाढवून घेतला ज्यामुळे पहिल्या मजल्या पर्यंत पाणी आपोआप वर चढेल ८ ठिकाणी वार्डात नवीन बोरवेल मारले विद्युत पंपसेट बसविलेत , सर्व बोरवेल मधून नवी टाकी बसवून २४ तास पाणी पुरवठा होईल या दृष्टीने नळ जोडणी करून घेतली

ड्रेनेज : अमृत सिटी योजने अंतर्गत शास्त्री नगर,मुचंडी मळा भागात नवीन ड्रेनेज करण्यात आली आहे जवळपास १८ किमी लांबीची फायबर पाईप ची ड्रेनेजलाइन २५ कोटी खर्चून बनविली आहे . तर शहापूर भागात चीनी माती पाईप ने २५ लाख निधीतून बनविली . गेल्या ५० वर्षात पहिल्यांदाच रामलिंग वाडी भागात ५ लाख खर्चून रस्ता आणि ड्रेनेज

रस्ते – प्रमुख रस्ते –गोवा वेस ते पहिले रेल्वे फाटक, महात्मा फुले रोड ,गुडस शेड रोड .

संपर्क रस्ता -डेक्कन हॉस्पिटल ते नुरानी बिल्डींग हा शॉर्ट कट रस्ता बनविण्याचे श्रेय महेश नाईक यांना जाते . हा रोड बनविण्यासाठी घेतली किरण ठाकूर यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची मदत ,रेल्वे विभागाने हरकत घेऊन  एक कोटी भरा मग रस्ता करा अशी केली होती मागणी…जिल्हाधिकारी तत्कालीन आयुक्त एस रवी कुमार यांच्या प्रयत्नाने ५ लाख रुपये भरून पूर्ण केला रस्ता, सर्वात महत्वाचा संपर्क रस्ता बनविला गेला आहे यामुळे अनेक जण शॉर्ट कट रस्ता वापरत आहेत …. ओवर ब्रिज पासून नुरानी बिल्डींग या भागातील ५ वार्डासाठी मोठी पिण्याच्या पाण्याची लाईन नेली

टिळकवाडी – दुसऱ्या १०० कोटी अनुदानात २५ लाख खर्चून सोमवार पेठ टिळकवाडी येथे पेवर्स च काम पूर्ण केल , एस एफ सी अनुदानातून डांबरी रस्त्याचे काम केले.

संपर्क रस्ता – शास्त्री नगर ते गुडस शेड रोड बनविला यामुळे ५ कि मी अंतर वाचले या भागातील लोकांचे

संपर्क रस्ता – गोवा वेस स्विमिंग पुला बाजूने डी पी स्कूल कडे … या भागातील लोकांच अंतर वाचलं गोवा वेस कडे येताना

नाला – इंदप्रस्थ नगर भागात पूरस्थिती निर्माण होते म्हणून एक कोटी २५ लाख खर्चून नाला बनवणे काम सुरु आहे

गोवा वेस ते मुचंडी मळा लेंडी नाला एस एफ सी मधून दीड कोटीच्या अनुदानानातून बनवला नाला

महापौर म्हणून शहरासाठी योगदान – जुने बेळगाव आणि कपिलेश्वर नवीन तलाव बांधले

mahesh naik corporator 1

 

यांच्याच कार्यकाळात अमृत योजनेची सुरुवात

सर्वात जास्त सर्वसाधारण बैठका तेही शांततेत पार पडल्या

ई संगणक प्रणाली इ टक्स प्रणाली ठराव झाला होता संमत

बसवणकोळ पाणी प्रोजेक्ट काम सुरु

विहिरींच जास्तीत जास्त पुनरुज्जीवन झाल होत यास दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता महा पालिकेस

आपल्या वार्डात अमृत सिटी फंडातील 25 कोटी निधी वापरला आहे इतर असा 8 कोटी निधी त्यांनी वापरला आहे
वार्डात सहकार्याच्या मदतीने दर रविवारी सकाळी स्वच्छता मोहीम सुरू केली असून ती अविरत सुरू आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.