Thursday, April 25, 2024

/

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

 belgaum

Farmer injuredशेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याने गंभीर जखमी अवस्थेत शेतकऱ्याला उपचारासाठी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे.
आप्पाजी धाकलु गावडे वय 45 अस या शेतकऱ्याच नाव असून कोसेकोप नागरगाळी गावचा आहे. आप्पाजी आणि त्याची पत्नी नागुबाई हे दोघेजण शेतात काम करत असतेवेळी अचानक अस्वलान हल्ला करून आप्पाजी यास गंभीर जखमी केलं आहे. मंगळवारी दुपारी 12 च्या दरम्यान ही घटना घडली आहे अस्वलाने पूर्ण शरीर ओरबडल असून डाव्या डोळ्याचा चावा घेत उजव्या डोळ्याला नखाने मोठी दुखापत केली आहे.सदर शेतकऱ्याने अस्वला बरोबर चांगलाच प्रतिकार केल्याची माहिती मिळाली आहे. खानापूर तालुक्यात शेतकऱ्यावर वन्य प्राणांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत.

बातमी सौजन्य-अरविंद कडुकर

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.