खानापूर तालुक्यातील बिडी गावात तळ्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . बिडी गावाबाहेरील तळ्यात ही दुर्घटना घडली असून समद अब्दुल कित्तूर (१२) आणि सादिक अब्दुलसाब बेपारी(१८)असे बुडून मृत्यू पावलेल्या मुलांची नावे आहेत.समद हा डबा बांधून तळ्यात पोहायला गेला होता.तळ्यात पोहत असताना डबा सुटला आणि तो गटांगळ्या खाऊ लागला.त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी सादीकने तळ्यात उडी घेतली .पण समद आणि सादिक दोघेही तळ्यात बुडाले.नंदगड पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.