कुंडली बघून लग्न ठरविणाऱ्या आपल्या सामाजिक चुकीने एक मुलीचे सारे जीवन उध्वस्थ होणार होते, नियोजित वराला एच आय व्ही ची बाधा आहे ही गोष्ट लपवून ठेवण्यात आली होती, सामाजिक संघटनांनी ती वेळेत लक्ष्यात आणून दिली आणि हा प्रकार थांबला गेला.
आश्रय फौंडेशन च्या नागरत्न यांनी हे त्या मुलीचे जीवन उध्वस्थ होण्यापासून वाचविले आहे. त्यांना स्वतःलाही असाच त्यांच्या पतीपासून हा भयानक रोग झाला आहे.
मंगळवारी त्यांनी त्या मुलीच्या पालकांना या गोष्टीची कल्पना दिली, फसवून लग्न केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. नागरत्ना आणि टी बी अधिकारी शैलजा तिप्पांनावर यांनी मोठे प्रयत्न केले. अशी फसवणूक करणाऱ्यांना ५ वर्षांचा कारावास होऊ शकतो. असे बेळगाव live शी बोलतांना त्या म्हणाल्या.
लग्न जुळवताना कुंडली बघण्या पेक्षा खरतर रक्त तपासून बघण्याची खरी गरज आहे, मात्र लोक दुर्लक्ष करतात हे फार चुकीचे आहे, असे त्यांनि सांगितले.
