निरुपा रॉय नंतर हिंदी सिनेमात हिरो च्या आई ची भूमिका साकारत आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या रीमा लागू गेल्या. त्यांचं बेळगाव शहराशी एक वेगळंच नातं होतं. त्यानी अनेकदा बेळगाव ला भेटी दिल्या होत्या मागील वर्षी येळळूर येथे मराठी साहित्य संमेलनातील सहभाग ही त्यांची शेवटची भेट ठरली.
रीमा लागू यांच्या रूपाने एक चांगली अभिनेत्री गेली याचे दुःख बेळगावकरांना नक्कीच राहणार आहे. त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू त्यांच्या येळ्ळूर येथे डॉ सोनाली सरनोबत यांनी घेतलेल्या मुलाखतीतून उलगडले होते. त्या एक चांगल्या आवाजाच्या चतुरस्त्र अभिनेत्री होत्या, खुद्द इंदिरा संतांना आपल्या कविता रीमा लागूनच्या आवाजात ऐकायला आवडायच्या.
कट्यार काळजात घुसली या चित्रपटात कट्यारिचा आवाज त्यांचा होता, त्या स्वतः आणि त्यांचा आवाज ही खरतर चित्रपटसृष्टीला मिळालेली एक देणगीच म्हणावी लागेल.
Trending Now