रशीद मलबारी यान बेळगावात असतेवेळी आश्रय घेतलेल्या सौन्दत्ती तालुक्यातील आसुंडी येथील फार्म हाऊस चा तपास होणार आहे. मलबारी चा मुख्य साथीदार माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष नजीर नदाफ याच्या मालकीच्या फार्म हाऊस मध्येच सर्व काळे धंदे चालायचे आणि इथूनच मलबारी अपहरण खंडणी सारखी सूत्रं हलवत होता बेळगाव ग्रामीण पोलिसांचं एक पथक आज आसुंडीत दाखल झाल असून त्यांनी तपास सुरू केला आहे. या अगोदर बेळगाव पोलिसांनी तीन विशेष पथक स्थापन केली असून एक मुंबई, बिहार नेपाळ सीमा तर बंगळुरू आणि मंगळुरू पोलीस तपास करत आहेत.
