बेळगावचे पी आर ओ

0
 belgaum

आठवड्याचा माणूस विकास कलघटगी !!

विकास म्हणजे विविध कार्यकारी सहकारी असे वर्णन नेहमीच होते. सतत सर्वत्र संचार, तरीही न थकता वाटचाल, माहितीचा अथांग सागर आणि साऱ्यांसाठीच पीआरओ म्हणून ते ओळखले जातात, सध्या शिवजयंतीच्या नियोजनात आघाडीवर असलेल्या विकासला बेळगाव live ने आठवड्याचा माणूस होण्याचा मान दिला आहे.
विकास हा व्यापारी वैश्य वाणी कुटुंबात जन्मलेला माणूस. ज्येष्ठ व्यक्तिमत्व काकासाहेब कलघटगी यांचा सुपुत्र, समाजाप्रती कळकळ घेऊन जगणारा एक कार्यकर्ता ही त्याची प्राथमिक ओळख. कोणत्या गोष्टीची बातमी होऊ शकते आणि बातमी कोणत्या माध्यमात आली की कोण कसा अडचणीत येऊ शकतो याची चावी विकासच्या हातात असते. यामुळे काहीवेळा तो बदनामही होतो, मात्र काहीही समस्या असली की गरज पडते ती विकासचीच, यामुळे नगरसेवक, आमदार, खासदार असो की जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त किंवा साधा सीपीआय साऱ्यांनाच ऐनवेळी विकासच लागतो.

bg

कोणताही महत्वाचा कार्यक्रम आयोजित करायचा झाला की विकास लागतोच, त्यामागे त्याचा पीआर कामाला येतो, आपली कामे सांभाळून विकास अनेक जबाबदाऱ्या लिलया पेलतात. मध्यंतरी एक अपघातात जखमी असतानाही विकासची धडपड थांबली नव्हती. एकाद्या राजकीय पुढ्याऱ्याशी त्याची जास्त सलगी झाली की विकास वर सारेच चिडलेले असतात, मात्र जेथे सत्ता तेथे विकास असे स्वतःच सांगत हसण्यावारी नेत विकासची धडपड सुरूच राहते.
विकास हे बेळगावचे नारदमुनी म्हणूनही परिचित आहेत, व्यवस्थित गुपित बातम्या बाहेर काढून जेथे हव्या तेथे फोडण्यात हे व्यक्तिमत्व पटाईत असते. यामुळे अनेकदा विकासवर बरेचजण राग काढतात तरीही जुळवून घेत विकासची वाटचाल सुरूच राहते.
अनेक संस्थांच्या कार्यकारिणी मंडळावर विकास आहे, प्रशासकीय बैठका त्याच्याविना होत नाहीत, विकासच्या परिश्रमाचे सार्थक व्हावे, त्यांचे काम असेच सतत सुरू राहावे, हीच बेळगाव live ची त्यांना शुभेच्छा.!!

जन संपर्कासाठी मोबाईल-09448470235Vikas kalghtgi

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.