राज्यसभा सदस्य आणि के एल ई संस्थेचे सर्वेसर्वा प्रभाकर कोरे सध्या केंद्रीय मंत्रिपदाच्या वाटेवर असल्याची माहिती बेळगाव live च्या हाती आली आहे, या स्पर्धेत लोकसभा सदस्य खा सुरेश अंगडी यांना ते मागे टाकतील असेच वातावरण आहे.
सध्या दोघेही दिल्लीत आहेत. कोरे यांनी उच्च शिक्षण मंत्रिपद मिळवण्याचे जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत, अंगडींचा प्रयत्न विशेष अश्या खात्यासाठी नाही, पदरी पडावे आणि पवित्र व्हावे एवढीच त्यांची इच्छा आहे, मात्र कोरेंचे मोदी दरबारी वजन मोठे असल्याने अंगडींचा निभाव लागेल असे वाटत नाही.
आमचे बेळगाव live चे दिल्ली येथील प्रतिनिधीही याला दुजोरा देत आहेत, बी शंकरानंद यांच्या नंतर बेळगाव जिल्ह्यातील कोणा एकाला केंद्रीय मंत्रिपद मिळावे अशी जनतेची अपेक्षा आहे, आत्ता ते शंकरानंद यांचे शिष्य कोरे यांच्या गळ्यात पडणार की नेहमी लाटेवर निवडून येऊन काहीच न करणारे अंगडी यांना, हे माहित नाही, कोरेंच बाजी मारतील असे वातावरण आहे.