बेळगाव लाईव्ह :बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या ‘प्लास्टिक मुक्त कॅन्टोन्मेंट’ अभियानांतर्गत निवासी भाग, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खासगी कार्यालयांमधील कचरा संकलन पूर्ण केल्यानंतर बोर्डच्या समर्पित स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आज शनिवारी सकाळी सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर टाकून दिलेली जुनी छायाचित्रे आणि देव-देवतांचे फोटो फ्रेम्स गोळा करण्याची विशेष स्वच्छता मोहीम राबविली.
सदर मोहिमेदरम्यान ग्रीन हॉटेल परिसर, धोबी घाट रोड, गणेशपूर रोड, पिकेट रोड, स्टेशन रोड, बीएसएनएल कार्यालय परिसर, आयनॉक्स थिएटरजवळ तसेच सेंट मेरीज हायस्कूल परिसरातील झाडा-झुडपांमधून नागरिकांनी उघड्यावर टाकून दिलेली जुनी छायाचित्रे आणि फोटो फ्रेम्स गोळा करण्यात आले.
या विशेष स्वच्छता मोहिमेत पूर्वजांचे, कुटुंबीयांचे तसेच देव-देवतांचे अनेक फोटो झाडांखाली, झुडपांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी आढळून आले. अशा पद्धतीने छायाचित्रांची विल्हेवाट लावल्याने अस्वच्छता निर्माण होण्याबरोबरच
सामाजिक व सांस्कृतिक बाबी
कुटुंबीय, पूर्वज किंवा देव-देवतांची छायाचित्रे उघड्या जागेत, झाडाखाली, नाल्यात किंवा जलस्रोतांमध्ये टाकल्यास अनेकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. तसेच त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कचरा वाढतो. त्यामुळे नागरिकांनी पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिक दृष्ट्या सन्मानपूर्वक विल्हेवाट लावण्याच्या पद्धतींचा अवलंब करावा. मात्र सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ राखावीत.

तेंव्हा स्वच्छ, हरित आणि प्लास्टिकमुक्त छावणी घडविण्यासाठी जनतेने सक्रिय सहकार्य करावे. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि सामाजिक भावनांचा आदर राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आमचे स्वच्छता कर्मचारी दररोज अथक परिश्रम करून छावणी परिसर स्वच्छ ठेवत आहेत.
नागरिकांनीही घरगुती कचरा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कचरा संकलन वाहनातच द्यावा आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळावे. “स्वच्छता ही केवळ कॅन्टोन्मेंट बोर्डची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. चला, आपण सर्वजण मिळून बेळगाव छावणीला स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नागरी जबाबदारीचे आदर्श उदाहरण बनवूया,” असे आवाहन बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम हरिविजय मंचलवार यांनी केले आहे.




