Thursday, April 25, 2024

/

हरियाणाच्या हितेशकुमार यान मारलं कणबर्गीच मैदान

 belgaum

Hitesh kumarतब्बल 30 हजार हुन अधिक कुस्ती प्रेमींची उत्कंठा पणास लागल्या नंतर 50 मिनिटात देखील कुस्तीचा निकाल न लागल्याने 2 मिनिटाच्या अधिक वेळेत अत्ता डावावर विजयश्री खेचत 17 वेळा भारत महान केसरी आणि 3 वेळा हिंद केसरी किताब जिंकणाऱ्या हरियाणाचा मल्ल हितेशकुमार यान कणबर्गीच कुस्ती मैदान मारलं आहे. मागील सलग दोन वर्षे हिंद केसरी किताब जिंकणाऱ्या मोसम खत्री यास अत्ता डावावर शेवटच्या दोन मिनिटात मात दिली .

बेळगाव तालुक्यातील कणबर्गी येथे जय हनुमान कुस्तीगीर संघटना, एस एस स्पोर्ट्स फौंडेशन च्या वतीनं आयोजित कुस्तीची दंगल आयोजित करण्यात आली होती .यावेळी 50 हुन अधिक चटकदार कुस्त्यांचे आयोजन करण्यात आलं होतं.आमदार फिरोज सेठ, राजू सेठ, मोहन मोरे, उपमहापौर नागेश मंडोळकर यांनी प्रथम क्रमांकाची कुस्ती लावली.

मेंढा कुस्ती कणबर्गीचा मल्ल सतीश बनोशी यान जिंकली इचलकरंजी चा पैलवान राकेश भोसले यास तिसऱ्या मिनिटाला मुलतानी डावावर पराभूत केलं. यावेळी 50 हुन अधिक चटकदार निकाली कुस्त्या झाल्या. माजी नगरसेवक संजय सुंठकर यांच्या प्रयत्नातून या जंगी कुस्त्यांचे संयोजन करण्यात आलं होतं

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.