Tuesday, April 23, 2024

/

इलियास ची थोपटली साऱ्यांनीच पाठ

 belgaum

Iliyasबेळगाव दि 24-प्रचंड गरीब, मूकबधिर, रस्त्यावर पाण्याच्या बाटल्या विकून घर चालवणारा इलियास, प्रामाणिकपणाच्या कसोटीवर बादशाह ठरला, यामुळे गणपत गल्लीत चक्क रस्त्यावर सत्कार समारंभ घेऊन त्याची पाठ थोपटण्यात आली. शुक्रवारी हा सोहळा झाला.
सिटीझन फोरम चे अनिल देशपांडे, ज्यांचा बाजूबंद परत केला ते विवेक रेवणकर, सुवर्णकार संघटनेचे सुनील पोतदार, गणपत गल्ली व्यापारी संघटनेचे रमेश पावले, महिला आघाडीच्या रेणू किल्लेकर, माजी महापौर विजय मोरे, नगरसेवक बाबूलाल मुजावर, चेंबर ऑफ कॉमर्स माजी अध्यक्ष संघाचे सतीश तेंडुलकर, सेवंतिभाई शहा,जायंट्स चे सदस्य मदन बामणे ,महादेव पाटील, बबन भोबे तसेच इतर व्यापारी उपस्थित होते.
विवेक रेवणकर यांचा ६० ग्राम चा बाजूबंद परत दिल्याबद्दल त्यांनी त्याला एक सोन्याची अंगठी दिली. शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि रोख रक्कम देऊन सन्मान झाला, त्याच्या प्रामाणिक पणाचे आणि इमानदारीचे कौतुक करण्यात आले. शांताई विध्या आधार मार्फत त्याच्या डिप्लोमा करणाऱ्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यात आली आहे.
रेवणकर यांच्या कामगाराने नजरचुकीने तो बाजूबंद टाकला होता, तो सापडल्या नंतर इलियास ने प्रामाणिकपणे परत केला, याचे फळ त्याला मिळाले. सत्कार समारंभासाठी तरुण भारतचे मनीषा सुभेदार, रमेश हिरेमठ तसेच सामाजिक कार्यकर्ते अजित कोकणे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.