Monday, July 15, 2024

/

प्राध्यापक किडनॅपिंग प्रकरणी तिघे जण अटकेत

 belgaum

बेळगाव ,दि . २४-कॉलेजला निघालेल्या प्राध्यापकाचा पाठलाग करून त्याला कारमधून बाहेर काढून सहा जणांनी फिल्मी स्टाईलने अपहरण केले पण पोलिसांनी त्वरेने हालचाल करून तीन तासात अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळून प्राध्यापकाची सुखरूप सुटका केली . शुक्रवारी सकाळी ही घटना घडली आहे . सुधींद्र धुळखेड असे अपहरण करण्यात आलेल्या प्राध्यापकांचे नाव असून ते गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सेवा बजावत आहेत . आर्थिक देवाणघेवाणीतून प्राध्यापकांचे अपहरण करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे . पोलीस आयुक्त कार्यालयात डी सी पी जी राधिका यांनी पत्रकार परिषदेत या अपहरण नाट्याची माहिती दिली .

अशोक मत्तिकोप ,भीमाप्पा नायक आणि कार चालक अडिवेप्पा कोरी याना पोलिसांनी अपहरण प्रकरणी अटक केली आहे .पोलीस सूत्रांची दिलेल्या माहिती नुसार अपहरणासाठी वापरण्यात आलेली कार जप्त करण्यात आली असून या प्रकरणी ठळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे . करडीगुद्दी जवळील बैरानटी येथील फार्म हाऊसमधून पोलिसांनी प्राध्यापकाची सुटका केली . अपहरणकर्त्यांनी प्राध्यापकाचा शारीरिक छळ करण्यास प्रारंभ केला होता . पोलीस वेळेवर पोचल्यामुळे अधिक इजा प्राध्यापकांना झाली नाही .

सुधींद्र धुळखेड हे व्हीटीयू येथे सेवा बजावत असताना तीनशे वीस कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याबाबत त्यांच्याशी आर्थिक व्यवहार कर्मचाऱ्यांनी केला होता . कर्मचाऱ्यांनी आपले काम होण्यासाठी त्यांना पैसे दिले होते पण काम झालेच नाही . त्यामुळे कर्मचाऱ्यांनी धुळखेड यांच्याकडे पैसे परत मागण्यासाठी तगादा लावला होता पण धुळखेड यांनी पैसे परत केले नाहीत असे अपहरणकर्त्यापैकी अशोक मत्तिकोप याने सांगितले . पण धुळखेड यांनी आपण पैशे घेतला नसल्याचा दावा केला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.