Friday, March 29, 2024

/

गणेश भक्तांनी आयोजित केलेल्या मोर्चाला महामंडळाचा पाठिंबा

 belgaum

ganesh mandalबेळगाव दि ५ :पीओपी संदर्भात बेळगाव शहरातील गणेश भक्तांनी  मंगळवारी ता. 7 रोजी आयोजित केलेल्या मोर्चाला मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाने पाठिबा दिला आहे.
शनिवारी ता. 4 रोजी कॅम्प येथील आमदार संभाजी पाटील यांच्या कार्यालयात महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, अध्यक्षस्थानी आमदार संभाजी पाटील,
प्रास्ताविक महादेव पाटील यांनी केले, त्यानंतर झालेल्या चर्चेत मदन बामणे यांनी काही मुद्दे मांडले, गेल्या तीन वर्षांपासून आम्ही मूर्तीची उंची कमी करावी, मूर्तीची विटंबना होऊ नये यासाठी शाडूच्या मुर्त्या आणाव्यात, मोर्चाचे नेतृत्व कोणत्याही राजकीय नेत्यांनी करू नये, निवेदन सर्वसामान्य गणेश भक्तांच्या हाताने द्यावे, मूर्ती मोठी करण्यापेक्षा उत्सव मोठा करा असे सांगितले,
मूर्तिकार परशराम पालकर म्हणाले की खानापूर तालुक्यात मुबलक शेडू आहे, खानापूर तालुक्यातील मूर्तिकार शेडूच्या मुर्त्या बनवायला तयार आहेत, काही मूर्तिकारानी महाराष्ट्रातून पीओपी च्या तयार मुर्त्या आणून इथे फक्त कलर करून चढ्या दराने त्या मुर्त्या विकून बाजारीकरण मांडले आहे, अश्याच काही मोजक्या मूर्तिकारांचा शेडूच्या मूर्तींना विरोध आहे, त्यामुळे बेळगाव व खानापूर तालुक्यातील खरे कलाकार बाजूलाच राहिले आहेत.
विकास कलघटगी म्हणाले की सर्वात पहिला जानेवारीच्या 18 तारखेला महामंडळाने मूर्तिकारांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे, व मूर्तिकारांना प्रशासनाकडून जो त्रास होतो आहे, तो होऊ नये म्हणून प्रयत्न केले आहेत.
रणजित पाटील म्हणाले की बेळगावच्या उत्सवाची परंपरा जपली पाहिजे,
रमाकांत कोंडुस्कर म्हणाले की मंगळवारी गणेश भक्तांनी आयोजित केलेल्या मोर्चाला महामंडळाने पाठींबा द्यावा, आणि पीओपी च्या मूर्त्यांना विरोध करू नये ,त्याचप्रमाणे गणेश उत्सव मंडळांना मूर्तीच्या उंचीवर महामंडळाने बंधने घालू नयेत.
सर्वांचे विचार ऐकून आमदार संभाजी पाटील म्हणाले की जानेवारी महिन्यातच आम्ही मूर्तिकारांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. आणि त्याचवेळेला मी संगीतलो आहे की तुम्ही पीओपी च्या मुर्त्या बनवा मी तुमच्या पाठीशी आहे. नागरिक उसत्व करतात, प्रशासन नव्हे? तेंव्हा जिल्हा पालकमंत्री रमेश जर्किहोळी यांना भेटून पीओपीवर घातलेली बंदी प्रशासनाने मागे घ्यावी, अशी विनंती करणार आहोत, त्यासाठी गणेश भक्तांनी आयोजित केलेल्या मोर्चाला महाममंडळाचा पाठिंबा जाहीर केला.
मोतेश बारदेशकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले,
यावेळी भावेश बिर्जे, सुधाकर चाळके, पुंडलिक पावशे, सुरेश जाधव, गणेश दड्डीकर, शिवराज पाटील, जयराम मिरजकर, नेताजी जाधव , जयवंत बाडीवाले उपस्थित होते.

बातमी सौजन्य : महादेव पाटील

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.