Saturday, April 20, 2024

/

अन्नदाता

 belgaum

Camp bepari 1Camp bepari 2Bepari iliyas ग्लोबल वार्मिंग मुळे  वाढत्या उन्हात  लाही लाही होत असताना  आणि पक्षांना पाणी आणि जेवण घाला असे संदेश सगळीकडे दिले जात असताना त्याची अंमलबजावणी मात्र कुठेच होताना दिसत नाही . मात्र   बेळगावातील एक  गृहस्थ ४०० हून अधिक  चिमण्यांना  दररोज चार वेळा खाऊ आणि पाणी   देत त्यांचा आधारवडच बनला आहे. यामुळे बेळगाव live चा     आठवड्याचा माणूस ठरला आहे.

बेळगाव शहराच्या कॅटोमेंट विभागात हॅवलोक रोड  कॅम्प  मधील प्रमुख मार्गावर  47 वर्षीय    इलियास  बेपारी पानपट्टी चालवितात…. त्यांचं एक छोटस किराणा स्टोअर आहे  या दुकानाच्या  समोर आणि बाजूला  बेलाची झाड  आहेत या झाडावर ३०० ते ४००  चिमण्यांचे वास्तव्य असते. चिमण्यांना ते  दररोज  दिवसातून  चार वेळा खाऊ घालत असतात  आणि  पाणी पिण्यासाठी एक खास कुंड  देखील बनविला आहे .  गेल्या  ८ वर्षापासून या  चिमण्यांचा ते नित्य नेमाने  सांभाळ करत त्याचा अन्नदाता बनले आहेत आणि  एक अनोखं असं पक्षी प्रेम  दाखवीलं आहे
इलियास   दररोज  सकाळी आपलं  दुकान उघडल्यावर  साफ सफाई केल्यावर पहिला चिमण्यांना तांदळाची कणी आणि काजूची  पावडर  दररोज  खाऊ घालतात  दररोज  दिवसातून ते चार वेळा हे काम करत असतात . अस करत इलियास यांनी ४००  चिमण्यांचा   उदरनिर्वाह सांभाळला आहे . यामुळे  चिमण्या शी खास  नात जुळल आहे . एके  दिवशी चिमण्याची  ६ पिल्ल भर पावसात झाडाखाली पडली  असता  इलियास  यांनी  त्या पिल्लाना  एका छोट्या बॉक्स मध्ये घालून  शेकोटी दिली त्यानंतर त्या पिल्लांना इतर चीमण्या मध्ये सोडून दिल   एरव्ही चिमण्यांना किंवा  कावळ्याला जर का माणसाचा स्पर्श झाला तर  सोबत असलेले साथीदार पक्षी  त्यांला बोचून बोचून जीवे मारतात मात्र इलियास चा चिमण्यांचा  पिल्लांना  स्पर्श झाला तरी चिमण्यांनी आपल्या  पिल्लांना आपल्यात  सामावून घेतलं हे पाहून ते भारावले.  यामुळेच इलियास  पक्षांना पण मन असत हे  सांगत असतात

आज महागाई वाढली आहे, माणूस माणसाला मदत करणे अवघड आहे, अशा काळात इलियास सारखे लोक आपले वेगळेपण जपत आदर्श निर्माण करतात, त्यांची सामाजिक पातळीवर विशेष दखल घेण्याची गरज आहे.

गेल्या 20 मार्च ला जागतिक चिमणी दिवस होता त्याचे औचित्य साधून माणुसकीच्या नात्या पेक्षा पलीकडचं नातं जपलेल्या या अन्नदात्यास बेळगाव live चा सलाम!!
इलियास बेपारी
कॅम्प बेळगाव
मोबाईल नंबर +919901038956

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.