Friday, May 24, 2024

/

बोगारवेस नव्हे “धर्मवीर संभाजी चौक” उल्लेख करा : शिवसेना

 belgaum

बेळगाव दि २ : बेळगाव शहरातील महत्वाच्या अश्या चौकाच नाव धर्मवीर संभाजी चौक असताना देखील राज्य परिवाहन मंडळाच्या जनस्नेही सीटी बस आणि तिकिटावर वर बोगारवेस असा उल्लेख करण्यात येत आहे .हे बदलून धर्मवीर संभाजी चौक असा उल्लेख करा अशी मागणी बेळगाव शिव सेनेने केली आहे .

जनस्नेही बस सेवा सुरु करून राज्य परिवहन मंडळान स्तुत्य उपक्रम हाती घेतला असून खाजगी वाहन धारकाकडून प्रवाश्याची लुट थांबविली आहे मात्र दुसरीकडे नवीन बस च्या फलकावर आणि तिकीटावर डी एस सी आणि बोगारवेस असा उल्लेख करण्यात येत आहे त्यामुळे  बेळगावकरांच्या भावना दुखावत आहेत . या सर्व फलकावर “धर्मवीर संभाजी चौक”  असा उल्लेख करावा शी मागणी शिवसेनच्या वतीने परिवहन मंडळाकडे केली आहे . शिवसेना जिल्हा उप प्रमुख बंडू केरवाडकर यांच्या नेतृत्वात परिवहन मंडळाच्या अधिकारी एम व्ही शशिधर यांना देऊन ही मागणी करण्यात आली आहे परिवहन मंडळाचे अधिकारी कुणाच्या सांगण्यावरून संभाजी चौक एवजी बोगारवेस असा उल्लेख करत आहेत या शिवाय संभाजी महाराजांचं नाव गाळण्याचा उद्देश्य काय ? कुणाच्या सांगण्यावरून हिंदूंच्या भावना भडकावत आहातअसा  सवाल देखील सेनने दिलेलेया निवेदनात विचारण्यात आला आहे . या विषयी लवकर नाव न बदलल्यास शिव सेना आंदोलन करेल असा इशारा ही निवेदना द्वारे दिला आहे

shivsena memo .ksrtc

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.