बेळगाव दि २ : कोल्हापूर मराठा क्रांती मोर्चात ज्या प्रमाणे बेळगावकर सीमावासीय हजारोंच्या संख्येने सामील झालेत त्याची परतफेड करायला कोल्हापूर कर मराठी जनता सज्ज आहे . बेळगावातील १७ फेब्रुवारीच्या मोर्चात हजारोच्या संख्येने कोल्हापूरकर सामिल् होतील अस ठोस आश्वासन कोल्हापूर अखिल भारतीय मराठा महा संघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिल आहे .
खानापूर येथील शिव स्मारकात मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृती साठी आयोजित बैठकीत सामील झाल्या नंतर ते बोलत होते. यावेळी खानापूर तालुक्यातील शकडो मराठा आणि मराठी बांधवानी बैठकीस उपस्थिती लावली होती . मुळीक पुढे म्हणाले की मराठा समाजाला क्रांती मोर्चा च महत्व काय आहे हे महाराष्ट्रातील मोर्चा मूळ सगळ्यांना समाजाला आहे त्यामुळे प्रत्येक माणसाने समाजासाठी योगदान देण गरजेच बनल आहे . सीमा प्रश्न अंतिम टप्यात असताना बेळगाव हे महाराष्ट्रापासून वेगळ आहे अस कधी आम्ही मानलं नाही त्यामुळेच कोल्हपुर च्या मोर्चात बेळगावचा विषय पहिल्या पाच मागण्यात मांडला होता असही मुळीक म्हणाले.
यावेळी खानापूरचे आमदार अरविंद पाटील म्हणाले की सीमा प्रश्न हा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यामुळे सीमा प्रश्ना शिवाय काहीही सीमा भागात काहीही यशस्वी होत नाही खानापूर तालुक्यातून हजारोच्या संख्येने मूक मोर्चात कार्यकर्ते सामील होतील असा विश्वास व्यक्त केला . यावेळी सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .