Friday, May 24, 2024

/

मराठा योद्धा मनोज जरांगे येणार बेळगावला

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सीमाभागातील मराठा समाज, मराठी भाषिकावर होणाऱ्या अन्याय विरूध्द सर्व मराठ्याना, मराठी भाषिकांना, एकत्रित करून अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील बेळगावला येणार आहेत.

मंगळवारी सकाळी जालना येथीलअंतरवाली सराटी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली व याविषयी सविस्तर चर्चा केली.

बेळगाव सह सीमा भागातील मराठा समाजाला मराठी माणसाला एकत्रित करण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे यांची जाहीर सभा बेळगाव येथे मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी होणार आहे.

 belgaum

या भेटी विषयी बोलताना सीमाभागातील मराठी भाषिकांच्या वर कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या सातत्याच्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी व सर्व मराठा समाज, व मराठी भाषिकांना एकत्रित करून न्याय मागण्यासाठी मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांना बेळगावला येण्याचे आमंत्रण दिले असून ते बेळगावला येणार आहेत त्यांचा दौरा निश्चित झालाय अशी माहिती माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिली.

मनोज जरांगे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात मराठा क्रांती मोर्चा मराठा समाजाच्या वतीने माजी आमदार व मध्यवर्ती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किनेकर, माजी नगरसेवक अँड अमर येळ्ळूरकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी , युवा आघाडी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव मनोहर संताजी यांचा सहभाग होता.Manoj jarange

समितीच्या शिष्टमंडळाने मराठा समाज, मराठी भाषेवर होणारा अन्याय त्यांच्यासमोर मांडला त्याला अनसरून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजावर व मराठी भाषिकवर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात सीमा भागातील सर्व मराठ्यांना व मराठी भाषिकांना एकत्रित करण्यासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरुद्ध आपण लढून सर्व मराठा समाजाला, मराठी भाषिकांना एकत्रच करू असे आश्वासन दिले.

सदर अन्यायाविरुद्ध आपण पंतप्रधानाकडे आपणही मागणी मांडू व या आंदोलनाच्या माध्यमातून पंतप्रधानाकडे दाद मागण्याचे आश्वासन दिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.