बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय पक्षांनी वैयक्तिक आणि राजकीय स्वार्थासाठी राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेल्या राजकारणाला आणि छत्रपती शिवरायांच्या झालेल्या अवमानाला प्रत्त्युत्तर देण्यासाठी तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांची ताकद दाखविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने राजहंसगडावर १९ मार्च रोजी भव्य सोहळ्याचे...
बेळगाव लाईव्ह : २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण देशात कमळ फुलले. २०१४ नंतर देशभरात भारतीय जनता पक्ष बहुमतात आला. अनेक ठिकाणी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले.
देशवासियांना भाजप आणि मोदींच्या नेतृत्वाची भुरळ पडली आणि यादरम्यान अनेक ठिकाणी काँग्रेसची पीछेहाट झाली....
बेळगाव लाईव्ह : रविवार दि. १९ मार्च रोजी येळ्ळूर येथील राजहंसगडावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक आणि शुद्धीकरण सोहळा आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाच्या तयारीसाठी मागील १५ दिवसांपासून समिती नेत्यांसह कार्यकर्तेही युद्धपातळीवर तयारी करत असून रविवारी...
बेळगाव लाईव्ह : विविध मागण्यांचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवणाऱ्या परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांचा आणि सरकारमधील ताणाचा तिढा सुटता सुटेनासा झाला आहे. परिवहन महामंडळाच्या वेतनवाढीच्या मागणीला राज्य सरकारने प्रतिसाद दिला मात्र २४ टक्क्यांऐवजी १५ टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा २० मार्च रोजी बेळगाव दौरा ठरला आहे. युवा क्रांती मेळाव्याच्या या पार्श्वभूमीवर बेळगावमधील सीपीएड मैदानावर जय्यत तयारी करण्यात येत आहे.
भव्य शामियाना आणि सुमारे २ लाख नागरिकांसाठी आसन व्यवस्था याठिकाणी करण्यात...
प्रशासनाची दिशाभूल करत आमच्या जमिनीसह घरांवर ताबा मिळवून आम्हाला बेघर करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे त्या अनुषंगाने केलेल्या अर्जाचा विचार केला जाऊ नये. तसेच गुंडांकरवी आमची जागा घरे हडपण्याचा प्रयत्न होत असल्याने आमची मालमत्ता आणि आमच्या कायदेशीर अधिकारांचे संरक्षण...
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकते. बेळगाव जिल्ह्यातील अठरा मतदान केंद्रांवर एकूण २३ हजारांहून अधिक कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व नोडल अधिकारी व पथकांनी तयारी करावी, निवडणूक कर्तव्यात कोणत्याही प्रकारची...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली येथे कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ अथक परिश्रम घेणारे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी नुकतीच महत्त्वाची बैठक केली.
सदर तीन तासाच्या बैठकीत शाह यांनी बेळगाव जिल्ह्यातील राजकीय घडामोडी जाणून घेण्याबरोबरच या भागात...
खानापूर तालुक्यातील मोदेकोप क्रॉस जवळ आठ दिवसांपूर्वी जप्त करण्यात आलेल्या गोवा बनावटीच्या 750 बॉक्स पैकी तब्बल 301 बॉक्स चक्क अबकारी अधिकाऱ्यांनीच हडप केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खानापूरच्या दोन अबकारी निरीक्षकांसह एकूण 5 जणांना तडकाफडकी निलंबित करण्यात...
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डसह देशातील 57 कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणुका महिन्याभरातच रद्द करण्यात आल्या असून संरक्षण मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
निवडणुका रद्द करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या...