बेळगाव लाईव्ह : अपात्र असूनही अंत्योदय योजनेअंतर्गत बेकायदेशीर रित्या शिधापत्रिका मिळवून त्यावरील लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांविरोधात राज्यव्यापी मोहीम आखण्यात आली असून आतापर्यंत या मोहिमे अंतर्गत १३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सदर मोहिमेदरम्यान बीपीएल कार्डे आढळून आलेल्यांमध्ये सरकारी कर्मचारी...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी परवानाधारकांकडून पोलीस ठाण्यात जमा करून घेण्यात आलेली बंदूका वगैरे परवाना असलेली शस्त्रे आता निवडणूक संपल्याने पुन्हा संबंधितांना परत दिली जात आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातून एकूण 7,720...
उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सहकार्य करावे.
त्यासाठी वारणा आणि कोयना जलाशयातून कृष्णा नदी पात्रात तर उज्जनी जलाशयातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एका पत्राद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...
बेळगाव महानगरपालिकेकडून एपीएमसी येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा शहरातील पहिला प्रकल्प तयार करण्यात आला असून सध्या वीज व नळ जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या या प्रकल्पाद्वारे 1 किलो वॅट वीज निर्मिती केली जाणार आहे.
बेळगाव महापालिकेने कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती करणारे तीन प्रकल्प...
दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 1 जून 1986 सालच्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्मा अभिवादन करण्याचा कार्यक्रम उद्या गुरुवार दि. 1 जून 2023 रोजी सकाळी ठीक 8:30 वाजता हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रति वर्षाप्रमाणे सीमाभागातील मराठी बांधव 1...
बेळगाव लाईव्ह : हेमू कलानी चौकात ऑन ड्युटी,मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पोलीस कर्मचारी आणि नागरिकांचा वादावादीचा प्रसंग घडल्याचे समोर आले आहे.
ऑन ड्युटी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला जमलेल्या नागरिकांनी जाब विचारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला असून या पोलीस कर्मचाऱ्याला नागरिकांनी जाब...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव स्मार्ट सिटी म्हणून जरी नावारूपास आले असले तरी बेळगावमधील मूलभूत सुविधा अद्यापही प्रगतीपासून वंचित आहेत याचा प्रत्यय अनेकवेळा येत असतो.
सोमवारी शहराच्या मध्यवर्ती भागात देखील अशाच प्रकारावरून 'बेळगाव लाईव्ह' ने वृत्त प्रकाशित केले होते. 'भातकांडे गल्ली...
बेळगावात वीज कोसळून दोघांचा मृत्यू
बेळगाव लाईव्ह : अथणी येथे आज सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. मृतांत एक तरुण व महिलेचा समावेश आहे.
बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील केसकरी दड्डी गावातील रहिवासी अमूल जयसिंग कानडे (वय २४) आणि...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव नगरविकास प्राधिकरणामध्ये अव्यवहार झाल्याप्रकरणी आरोप पुढे आले असून याप्रकरणाची सीओडी किंवा सीआयडी चौकशी केली जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
सुवर्ण विधानसौध येथे आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते....
पावसाळ्याला प्रारंभ होत असल्यामुळे सर्वप्रथम उद्यापासूनच जिल्ह्यातील सर्व आमदारांना माहिती देऊन त्यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना बियाणं आणि खतांचा पुरवठा करण्याचे काम हाती घेतले जावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे आज...