belgaum

बेळगाव शहर देवस्थान मंडळातर्फे २० ऑक्टोबरला दसरा महोत्सव

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर देवस्थान मंडळातर्फे मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता विद्यानिकेतन मैदानावर (ज्योती कॉलेज मैदान) पारंपरिक दसरा महोत्सव व सिमोल्लंघन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या पारंपरिक सोहळ्याची सुरुवात चव्हाट गल्लीतील श्री जोतिबा देवाच्या सासनकाठीची व नंदीची विधिवत पूजा करून होईल. त्यानंतर हुतात्मा चौक येथे शहरातील विविध देवस्थानांच्या पालख्या व सासनकाठ्या एकत्र येऊन सिमोल्लंघन मैदानाकडे वाजत-गाजत मार्गस्थ होतील.

मैदानावर बेळगावचे वतनदार चव्हाण-पाटील घराण्याकडे असलेल्या पारंपरिक तलवारीचे शस्त्रपूजन देवस्थान मंडळाच्या वतीने केले जाईल.

 belgaum

या प्रसंगी शहरातील मान्यवरांचा सत्कारही करण्यात येणार आहे.या सोहळ्यासाठी मंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील आणि सेक्रेटरी परशराम माळी यांनी महापौर प्रीती कामकर, आमदार आसिफ सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन , पोलीस आयुक्त प्रकाश निकम व मनपा आयुक्त कार्तिक एम. आदींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रित केले आहे.

शहरातील पंच मंडळ, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.