belgaum

अखेर कन्नड समर्थकांच्या आंदोलनाला यश?

0
City corporation bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेत कर्नाटकाच्या बाजूने ठराव मंजूर करावा, या कन्नड संघटनांच्या मागणीला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत अधिकृत आदेश जारी केल्याचा दावा बेळगावातील कन्नड संघटनांच्या महासंघाने केला आहे.

कन्नड आंदोलनकर्ते अशोक चंदरगी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, बेळगाव महानगरपालिकेत कर्नाटकाच्या बाजूने ठराव मंजूर करावा, अशी कन्नड संघटनांची मागणी होती. या मागणीला राज्य सरकारने मान्यता देत अधिकृत आदेश जारी केला आहे.

या आदेशाची प्रत लवकरच हाती मिळणार असून, त्यासंदर्भातील संपूर्ण माहिती मंगळवारी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत दिली जाणार असल्याचे चंदारगी यांनी सांगितले.

 belgaum

बेळगावातील समान विचारांच्या कन्नड संघटनांच्या वतीने मंगळवारी सकाळी ११ वाजता कित्तूर राणी चन्नम्मा चौकातील कन्नड साहित्य भवनात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

बेळगाव महानगरपालिकेत ‘बेळगाव आमचे’ या आशयाचा ठराव मंजूर करावा, या मागणीसाठी कन्नड संघटना गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. मात्र, महानगरपालिकेकडून या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने हा विषय राज्य सरकारच्या पातळीवर पोहोचला होता.

या प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश यांनीही सविस्तर अहवाल मागवला होता. आता ठराव मंजूर करण्यासंदर्भात सरकारकडून आदेश जारी करण्यात आल्याचे चंदरगी यांनी सांगितले.

त्यामुळे कन्नड समर्थकांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाल्याचा दावा कन्नड संघटनांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, कन्नड भाषिक राज्यात कन्नडच्या बाजूने ठराव मंजूर करण्यासाठी आंदोलन करावे लागणे हीच मोठी विडंबना असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.