belgaum

शहर पोलिसांची दमदार कामगिरी; १३ पुरस्कारांची कमाई

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव उत्तर विभागस्तरीय ८व्या कर्तव्य कूट-२०२६ स्पर्धेत बेळगाव शहर पोलीस पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल १३ पुरस्कारांची कमाई केली आहे. यामध्ये ११ पदके आणि २ ट्रॉफींचा समावेश असून, शहर पोलीस पथकाने संपूर्ण विभागात द्वितीय क्रमांक पटकावला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव शहर पोलीस युनिटने तांत्रिक, वैज्ञानिक आणि विविध विशेष पोलीस कौशल्यांच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. यामध्ये पोलिसांनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत विविध प्रकारांत यश मिळवले.

पीआय मंजुनाथ बडीगेर यांनी मेडिको-लीगल स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय संतोष दलवाई यांनी फिंगरप्रिंट प्रॅक्टिकल टेस्टमध्ये प्रथम, मेडिको-लीगलमध्ये द्वितीय, तर हँडलिंग, लिफ्टिंग अँड पॅकिंग टेस्टमध्ये तृतीय क्रमांक पटकावला.

 belgaum

खडे बाजार पोलीस ठाण्याचे पीएसआय सरदारगौडा मुट्टत्ती यांनी हँडलिंग, लिफ्टिंग अँड पॅकिंग टेस्टमध्ये द्वितीय, फिंगरप्रिंट प्रॅक्टिकल टेस्टमध्ये तृतीय तसेच फॉरेन्सिक सायन्स लेखी परीक्षेत तृतीय क्रमांक मिळवला.

डॉग स्क्वॉडचा दबदबा

बेळगाव शहर पोलीस दलाच्या डॉग स्क्वॉडने विशेष चमक दाखवत क्राईम ट्रॅकरमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तसेच डॉग स्क्वॉडने ओव्हरऑल चॅम्पियनची विजेती ट्रॉफी पटकावली. ८व्या ड्युटी मीट-२०२६मध्ये बेस्ट रेंज डॉगचा बहुमानही मिळवण्यात आला.

डॉग स्क्वॉडमध्ये एपीसी ११६ रुद्रय्या माविनकट्टीमठ – रोजी, एपीसी ४७३ संतोष पाटील – रोजी, एपीसी ३६१ रमेश बुर्ली, एपीसी ४०० अभिषेक सुळ्ळण्णावर – कोको (एनडीपीएस डॉग) आणि एपीसी ४५६ एम.आय. हंचीनमणी – ल्युसी यांचा सहभाग होता.

याशिवाय एएससी टीमचे एएससी २४८ अजित आर. पाटील यांनी ग्राउंड सर्च स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.

पोलीस फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी टेस्टमध्ये एआरएसआय एस.एम. गडकरी यांनी प्रथम, तर एपीसी ४३६ राकेश तळवार यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

या यशामागे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची शिस्त, समर्पण, व्यावसायिक कौशल्य, संघभावना आणि कर्तव्याप्रती असलेली बांधिलकी महत्त्वाची ठरली. आरपीआय एच. शेख, सी अँड आर विभाग, बेळगाव शहर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

या यशाबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले. तसेच डीसीपी (कायदा व सुव्यवस्था), डीसीपी (प्रशासन) आणि डीसीपी (सी अँड आर) यांनीही पथकाचे अभिनंदन केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.