belgaum

कर थकबाकीदारांना नोटिसा!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : महापालिकेचा एक लाख रुपयांपेक्षा अधिक कर थकीत असलेल्या करदात्यांना पहिल्या टप्प्यात नोटिसा बजावण्याचे निर्देश महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी अधिकाऱ्यांना दिले.

महापालिकेच्या परिषद सभागृहात बुधवारी महसूल शाखेच्या प्रगती आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवून ते बोलत होते. महापालिकेचे उत्पन्न वाढवून विकासकामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. कर वसुलीचे निश्चित उद्दिष्ट गाठण्यासाठी महसूल शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक सक्रियपणे काम करावे, असे त्यांनी सांगितले.

दुसऱ्या टप्प्यात ५० हजार रुपयांपेक्षा अधिक कर थकीत असलेल्या करदात्यांनाही नोटिसा बजावण्यात याव्यात. कर वसुलीदार व महसूल निरीक्षकांनी प्रभागांमध्येच राहून पथके तयार करावीत आणि कर वसुलीला वेग द्यावा, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

 belgaum

औद्योगिक व व्यावसायिक इमारतींच्या फेरमोजणीचे काम सुरू करण्यात आले असून ते लवकरात लवकर पूर्ण करून सुधारित कर आकारणी करावी. तसेच कर्मचाऱ्यांनी दैनंदिनी लिहावी आणि कामाच्या प्रगतीबाबत नियमित माहिती सादर करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.

प्रशासकीय विभागाचे उपआयुक्त उदयकुमार टी.बी. यांनी प्रास्ताविक केले. बैठकीला विभागीय आयुक्त, महसूल अधिकारी, निरीक्षक, कर वसुलीदार, विषय व्यवस्थापक यांच्यासह महसूल शाखेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.